जि. प. पोटनिवडणुकीसाठी ६ उमेदवारांचे १३ अर्ज दाखल
By Admin | Updated: January 13, 2015 23:00 IST2015-01-13T23:00:19+5:302015-01-13T23:00:19+5:30
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी १३ अर्ज दाखल केले आहे.

जि. प. पोटनिवडणुकीसाठी ६ उमेदवारांचे १३ अर्ज दाखल
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी १३ अर्ज दाखल केले आहे. यात प्रामुख्याने भाजपचे प्रशांत वाघरे व योगाजी बनपूरकर, काँग्रेसचे गोकुलदास ठाकरे व माणिक झंझाड, बसपाचे प्रशिक म्हशाखेत्री व अपक्ष विनोद दशमुखे यांचा समावेश आहे.
अखेरच्या दिवशी मंगळवारी ६ उमेदवारांनी १३ अर्ज सादर केले. त्यात योगाजी बनपूरकर यांनी भाजप व अपक्ष उमेदवार म्हणून ४ अर्ज सादर केले. प्रशांत वाघरे यांनी भाजपकडून एकच अर्ज भरला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून गोकुलदास ठाकरे व माणिक झंझाड यांनी प्रत्येकी २ अर्ज सादर केले. बहुजन समाज पक्षाकडून प्रशिक म्हशाखेत्री यांनी १ अर्ज सादर केला, तर विनोद दशमुखे यांनी अपक्ष म्हणून २ अर्ज सादर केले.
काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत मल्लेलवार यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्त नागपूर यांनी रद्द केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत २८ जानेवारीला सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ३० जानेवारी रोजी मतमोजणी गडचिरोली तहसील कार्यालयाच्या सभागृहात होईल. (जिल्हा प्रतिनिधी)