जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन कार्यक्रम उत्साहात
By Admin | Updated: August 17, 2015 01:18 IST2015-08-17T01:18:18+5:302015-08-17T01:18:18+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालयांत शनिवारी स्वातंत्र्यदिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, मार्गदर्शक कार्यक्रम पार पडला.

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन कार्यक्रम उत्साहात
शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांत वृक्षारोपण : गीतगायन, मार्गदर्शक कार्यक्रमांनी उत्सव साजरा
गडचिरोली : जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालयांत शनिवारी स्वातंत्र्यदिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, मार्गदर्शक कार्यक्रम पार पडला.
जिल्हा परिषद, गडचिरोली - येथील ध्वजारोहण जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, जि. प. सदस्य छाया कुंभारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व अधिकारी उपस्थित होते.
जि. प. हायस्कूल, गडचिरोली - स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. दीप जनबंधू, पुंडलिक येवले, रवींद्र बुरांडे, प्राचार्य जी. बी. थुल, पर्यवेक्षक प्रभाकर मेश्राम, पालक- शिक्षक संघाचे सहसचिव ईश्वर मुळे, सदस्य सुभाष येमुलवार, प्रमोद खोब्रागडे उपस्थित होते.
चामोर्शी - शहरातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व विविध कार्यक्रम घेण्यात आले. तहसील व उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, नगर पंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार यू. जी. वैद्य, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण अवचर, पंचायत समिती कार्यालयात सभापती शशिबाई चिळंगे, कृषक हायस्कूलमध्ये कृषक सुधार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रावणजी दुधबावरे, शिवाजी हायस्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गो. वि. बानबले, जा. कृ. बोमनवार विद्यालयात गुरूकृपा समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष प्र. सो. गुंडावार, यशोधरा विद्यालयात संस्थेचे कोषाध्यक्ष वक्टुजी उंदीरवाडे, जि. प. हायस्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णाजी बिश्वास, जि. प. नूतन शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास दुधबळे, जागेश्वर सावकार गण्यारपवार मराठी प्राथमिक शाळेत शरद चंद्रपवार, महिला महाविद्यालयात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर ताराम, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कर्मचारी, पोलीस शिपाई, विद्यार्थी उपस्थित होते.
कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी - प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. भूपेश चिकटे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, डॉ. कऱ्हाडे, डॉ. भूषण आंबेकर, प्रा. बावणे, प्रा. दीपक ब्राम्हणवाडे, प्रा. वंदना थुटे, प्रा. बुर्लावार, प्रा. गाजर्लावार, प्रा. राजीव म्हस्के, पत्रे उपस्थित होते.
प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा चक - उपसरपंच पुनेश्वर दुधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर. टी. ठेमस्कर, सरपंच मीना वाळके, पोलीस पाटील अनिल कुकडे उपस्थित होते.
जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल, गडचिरोली - ध्वजारोहण दंडकारण्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भैयासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य बी. जी. कुंभरे, एन. ए. भोपये उपस्थित होते. दरम्यान शाळा परिसरात वृक्षारोपण करून शालेय विद्यार्थ्यांा शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या तुषार खोब्रागडे याला पाच हजार रूपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संचालन मांडवे तर आभार झरकर यांनी मानले.
विद्याभारती कन्या विद्यालय, गडचिरोली - ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष भैयासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सिद्धार्थ नंदेश्वर, वनमाळी, प्राचार्य विद्या आसमवार उपस्थित होत्या.
जि. प. प्राथमिक शाळा, पोर्ला - शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चापले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका एल. एस. झंजाळ, केंद्रप्रमुख दिलीप मुप्पीडवार उपस्थित होते. वृक्षारोपण करून चावडी वाचन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी देविदास चापले, पांडूरंग भोयर, अशोक बोहरे, मंदा शामकुळे उपस्थित होते. संचालन रोकडे तर आभार विनय धात्रक यांनी मानले.
जि. प. प्राथमिक शाळा जेप्रा - ध्वजारोहण कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष रवींद्र शिंगाडे, गुणाजी देशमुख, उपसरपंच मंगला टेकाम, गुरूदास मारबते, गंगू गुज्जलवार, सरिता भुरसे, ज्योती गावतुरे, संगीता भोयर, वासुदेव गावतुरे, योगाजी मेश्राम, शामदास नरूले, नंदा सलामे, नक्टू लेनगुरे, दिवाकर नरूले, रेणू निकुरे, निरूता गावतुरे, गीता संदोकार, विनोद टेकाम, प्रियंका म्हशाखेत्री, मुख्याध्यापक फुलझेले उपस्थित होते.
कै. श्री. जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धानोरा - प्राचार्य डॉ. किरमिरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. गणेश चुधरी, डॉ. हरिष लांजेवार, डॉ. पंढरी वाघ, डॉ. विवेक जोशी, प्रा. ज्ञानेश बन्सोड, प्रा. झाडे, प्रा. धाकडे, प्रा. आवारी, प्रा. खोब्रागडे, प्रा. वटक, डॉ. सावरकर, प्रा. करमनकर उपस्थित होते.
भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली - शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय राजकोंडावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे, प्राचार्य बी. व्ही. पोटदुखे, अभय पुण्यमूर्तीवार, डॉ. आसुटकर, प्रा. भगत उपस्थित होते. प्रा. एन. झेड. निकुडे, प्रा. डॉ. कोंगरे, पत्तीवार, दुर्गे, पाटील, डांगे, मैंद, दरेकार यांनी सहकार्य केले.
किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोरेगाव - ग्रामोद्धार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दे. गो. चचाणे विद्यालयातील तर श्रीकृष्ण दुग्ध डेअरितील ध्वजारोहण वाल्मिक गायकवाड, गोवर्धन चौकातील ध्वजारोहण प्रभाकर भजने, जि. प. शाळेत पल्लवी लाडे, गांधी चौकातील ध्वजारोहण देवचंद वैद्य व समारोपीय ध्वजारोहण सरपंच ममीता आडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषी महाविद्यालय सोनापूर, गडचिरोली- ध्वजारोहण डॉ. गुळदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. एस. पी. लांबे, डॉ. एस. बी. ब्राह्मणकर, डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. जी. जे. भगत, डॉ. एस. आर. कामडी, डॉ. शुभांगी अलेक्झांडर, डॉ. अनोकर, डॉ. बोरकर, प्रा. कऱ्हाळे, प्रा. योगीता सानप, एच. एच. राठोड, पी. ए. सरप, डॉ. काळपांडे, सरोदे, भोंगळे, सातार, गणवीर, चौखे, नखाते, मुरतेली, गेडाम, कावळे, जाधव, सलामे, टेकाडे, खुळे, नरवाडे, भांडेकर, मोहन कुकूडकर, भजभुजे, कस्तुरे, मुरतेली उपस्थित होते.
उपजिल्हा रूग्णालय, कुरखेडा - स्वातंत्र्य दिनानिमित्त क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक टिकले, मैंद, पंडित, पवार, कल्पना भट, तुरकर, लभाने, मोगरे, राणे, उईके उपस्थित होते.
महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी - ध्वजारोहण मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी यांच्या हस्ते झाले. यावेळी देशभक्ती गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गीतगायन स्पर्धेचे संचालन प्रा. अमिता बन्नोरे, डॉ. विजय रैवतकर, ध्वजारोहणाचे संचालन प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे तर आभार प्रा. नोमेश मेश्राम यांनी मानले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अब्दुल पंजवानी, सोनबा निखारे, नामदेव सोरते, उमाकांत वनमाळी, विश्वनाथ डोकरे, शीतकुरा जराते, हरिश्चंद्र बोंदरे, सुनीता वनमाळी, हैदर पंजवानी, श्रीहरी नवघरे, किसन चिखराम, ग. रा. वडपल्लीवार, प्रा. डॉ. लालसिंग खालसा, प्रा. गोपाल तामगाळे, प्रा. साईनाथ अद्दलवार उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर ठाकरे, विजय गोरडे, पराग मेश्राम, किशोर हजारे, सी. डी. मुंगमोडे, सतेंद्र सोनटक्के उपस्थित होते.
आंचिव हायस्कूल, चिखली- स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक परशुरामकर व कर्मचारी उपस्थित होते.
पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी - संस्थेचे अध्यक्ष गोविंदराजन कवंडर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राठोड, विजयालक्ष्मी किलियामुड, मुख्याध्यापक केशवन कवंडर, कामदेव सोरते, हिरामण कुंभरे, किरण डाखोळे, निर्मला भोसले, नितुराणी मालाकर, सुजाता मेहर, मिनाज शेख, रतन खोब्रागडे, होमराज माकडे, प्रभा रामटेके, माधुरी वनवे, मोनाली त्रिकोलवार, शारदा मेंघरे, निर्मला नांदेकर, झांसी इंदुरकर, कुमता घोडेस्वार, नईमा पठाण, शारदा हर्षे, प्रशांत कतरे, नंदा बिजवे, किरण रामटेके, देब्रत मंडल, पूजा बिडवाईकर, तेजस्वर भोयर, नीतेश मेंढे, रत्नप्रभा खापर्डे, डाळिंबा उंदीरवाडे, अनिता दुमाने, शालू कोहाड, प्रतिभा मुंगले उपस्थित होत्या.
जि. प. प्राथमिक शाळा, मारकबोडी - स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला मुख्याध्यापक भैसारे, माणिक मेश्राम, उषा भांडेकर, उपसरपंच रूपेश चुधरी, खुशाल कोसरे, पंडित मेश्राम, नंदेश्वर, राऊत उपस्थित होते. संचालन सिद्धार्थ भैसारे तर आभार पोवरे यांनी मानले.
राजीव गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देसाईगंज - श्री साईबाबा शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव जे. सा. मोटवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आल्या. यावेळी धनराज मुंडले, आकाश अग्रवाल, विलास सूर्यवंशी, प्रकाश सांगोळे, हरी मोटवानी, उद्धव मोटघरे, कैलाश पाटील, खुशीद शेख, रमेश दुनेदार, अभय वासनिक, मोहित मोटवानी, अंकुश परसवानी, विशाल डेंगानी, सी. के. निकोसे उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू विद्यालय, जोगीसाखरा - हिरा मोटवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच नरेंद्र टेंभुर्णे, गरफडे, रामचंद्र भालाम, प्रधान उपस्थित होते. दरम्यान २० वृक्षांची लागवड करण्यात आली. संचालन प्रकाश पोहणकर तर आभार श्रीकृष्ण खरकाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गिरीधारी रहेजा, इंद्रजित डोके, संतोष हटवार, देविदास नैताम, रविशंकर ढोरे, श्रावण राऊत, प्रेमानंद मेश्राम, यशवंत मरापे यांनी सहकार्य केले.
जि. प. शाळा, कुदरशी टोला - ध्वजारोहण समितीच्या अध्यक्ष सुनीता बन्सी यांच्या हस्ते झाले. यावेळी सुदरसिंग साबळे, चंदू बन्सी, इंद्रजित बडे, रतन बन्सी, खंडूसिंग खसावत उपस्थित होते. प्रास्ताविक जी. बी. मुद्रे तर आभार चिपपल्लीवार यांनी मानले.
जि. प. शाळा, अनंतपूर - ध्वजारोहण समितीचे अध्यक्ष जागेश्वर रापांजी यांच्या हस्ते झाले. यावेळी सोमनाथ पिपरे, नामदेव नरोटे, रवींद्र नरताम, विलास सातपुते, काशिनाथ बुरांडे, सरिता नैताम, शीला चलाख, शीरबसी चंद्रभान नैताम, सोनपाल साबळे, सुरेश बोदलकर उपस्थित होते.
महात्मा गांधी न. प. शाळा, गडचिरोली - ध्वजारोहण मुखरू निंबोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस पाटील अनिल खेवले, सुधाकर चन्नावार, विजय कावळे, राजेश्वर मेश्राम, नगर सेविका वच्छला बारसिंगे, मुख्याध्यापिका साळवे उपस्थित होत्या.
वाघाये महाविद्यालय, आरमोरी - ध्वजारोहण संस्थेचे सचिव महेश तितीरमारे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. वऱ्हाडे, अमोल इंदूरकर, नलेश रहाटे, कांबळे, कोहाडे, नागमोती, मैंद, कोल्हे, एस. पी. परदेशी, व्ही. बी. पेंदाम, के. ए. राऊत उपस्थित होते. संचालन मेश्रात तर आभार गोटा यांनी मानले.
भगवंतराव हायस्कूल, अहेरी - स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी प्राचार्य खुशाल बांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रू मांडवकर, सुधाकर कोसरे, सुरेश बोरकुटे, धनराज लोखंडे, आनंदराव दुर्गे, रामा कुड्यामी, यशोदा गुरनुले उपस्थित होते. डॉ. श्रीराम महाकरकार, उत्तम मुंगमोडे, श्रीराम डुकरे, विलास पिंपळकर, शंकर वऱ्हाडकर, संजय बन्सोड, दिलीप समर्थ, सुनंदा जोगवे, हकीम, बैरागी, सिलमवार, सोनटक्के, रामगिरवार, सुरेंद्र मिलमिले, शेख यांनी सहकार्य केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड - प्रभारी प्रकल्प अधिकारी तथा लेखाधिकारी आर. आर. वाळूजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार अरूण येरचे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, प्रभारी पोलीस अधिकारी नाईकवाडे, जाधव, सब्बरबेग मोगल उपस्थित होते.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, रांगी - ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण व चावडी वाचन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष नरेंद्र भुरसे होते. कार्यक्रमाला विलास काटेंगे, पातेवार, मडावी, देवराव कुनघाडकर, गटपायले, शालिक भोयर, मनोहर भुरसे उपस्थित होते.
जि. प. हायस्कूल, मोहली - ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रभारी मुख्याध्यापक एस. एम. राऊत, ब्रम्हटेके, गहाणे, उसेंडी, हरडे, बी. जी. राऊत, एम. जी. राऊत, पी. व्ही. साळवे उपस्थित होेते. दरम्यान हरित सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चांभार्डा - शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू निंबोळ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच प्रभा ठाकरे यांच्या हस्ते चांभार्डा टोली येथे तंमुस अध्यक्ष खुमदेव चनेकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेत आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुकारे, उपसरपंच पुरूषोत्तम चनेकार, ग्रा. पं. सदस्य लोमेश कुमरे, प्रमोद बावणे, शोभा लाजूरकर, बॉबी चनेकार, कल्पना हलामी, ग्रामसेवक पी. पी. निंदेकर, पोलीस पाटील अश्विनी मसराम, मीनाकांत मसराम, माजी तंमुस अध्यक्ष मुखरू चनेकार, विलास ठाकरे, आनंदराव म्हशाखेत्री, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बानबले, शिक्षक मेश्राम, रामटेके, मडावी, बाबूराव लाजूरकर, ईश्वर लाजूरकर, उमाजी लाजूरकर, दिलीप चिकराम, पीतांबर गावडे, तुषार चनेकार, कैलाश कोरेवार, रोहिदास कोरेवार, नामदेव मुन्घाटे, प्रमोद अभारे, वनरक्षक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पोटेगाव - ध्वजारोहण मुख्याध्यापक जी. सी. खांडवाये यांच्या हस्ते झाले. यावेळी सुधीर शेंडे, ए. डब्ल्यू. बोरकर, एस. एल. पडवेकर, एन. यू. कुमरे, के. जी. गेडाम, व्ही. एम. नैताम, व्ही. एम. बनगीनवार, व्ही. एस. देसू, के. जी. घोसरे, के. व्ही. चौधरी, एस. आर. जाधव, वंदना देवतळे, एन. यू. कोसनशीले, वंदना खांडवाये, दिलीप चुलपार उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य व समूहगीत सादर केले. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच ओमकारेश्वर सडमाके, उपसरपंच प्रतिमा मोहुर्ले, महेश तुमरातीवार, माजी सरपंच सुधीर मडावी, नीलकंठ सडमाके, केंद्रप्रमुख डी. एस. आकरे, इंदरशहा मडावी, विलास बल्लमवार, शिवाजी नरोटे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना यावेळी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कारवाफा - ध्वजारोहण मुख्याध्यापक डब्ल्यू. के. भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल मंटकवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरवार, आर. जी. तुमराम, के. बी. बेझलवार, पी. एस. रिघनाथे, व्ही. जी. चाचरकर, एम. एच. वनझारा, एस. के. दोनाडकर, एच. के. कामडी, पी. आर. लोहकरे, एम. एम. नेहरकर, डब्ल्यू. एम. घोडाम, वाय. एस. हर्षे, एन. एम. गेडाम, व्ही. बी. मडावी, ए. एम. किन्नाके, ए. वाय. कुनघाडकर उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रेमिला कुमरे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, येरकड - ध्वजारोहण देवराव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य सुकमा जांगधुर्वे, मुख्याध्यापक भाष्कर कुद्रपवार, शिवकुमार भैसारे, सावजी नरोटे, के. आर. काटेंगे, केंद्रप्रमुख बुरे उपस्थित होते.
बाबूरावजी पाटील भोयर कला महाविद्यालय, वडधा - ध्वजारोहण प्राचार्य एम. टी. नवघडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. दुर्वेश भोयर व कर्मचारी उपस्थित होते. देशभक्ती गीतस्पर्धेत शक्ती कोसरे, शुभम रामटेके, दीक्षा ठाकरे यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.
उपजिल्हा रूग्णालय, अहेरी - रूग्णालय व राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी रॅली काढण्यात आली. यावेळी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य मंडल, डॉ. के. डी. मडावी, राकेश बरडे, विजय पोरेड्डीवार व कर्मचारी उपस्थित होते.
सगणापूर - ध्वजारोहण सरपंच सुनील कन्नाके यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच अंजना सामावार, पोलीस पाटील तन्वी कोडापे, तंमुस अध्यक्ष रेवनाथ पाल, पुनाजी पोरटे, ग्रा. पं. सदस्य ममता कोडापे, प्रकाश अक्कलेवार, मुरलीधर कोडापे, सीमा साखरे, रत्नमाला गेडाम, जि. प. सदस्य पावर्ता कन्नाके, कैलाश भोयर, कैलाश कोडापे, ग्रामसेवक महादेव निकुरे, मुख्याध्यापक राऊत, चौधरी, शेंडे, विजय मालेवार, सुभाष चुनारकर, रवी चुनारकर, राजू आभारे उपस्थित होते.
श्री संत गाडगे महाराज विद्यालय, गडचिरोली - ध्वजारोहण मुख्याध्यापक विश्वास भोवते यांच्या हस्ते झाले. यावेळी विनोद दशमुखे, डॉ. करेवार, कैलाश कडाम, दिलीप मोहुर्ले, लोमेश्वर बारसिंगे, भीमराव वनकर, नंदादीप मेश्राम, पिसाराम येनचिलवार, खोब्रागडे, पेरकिवार, व्ही. बी. आडे, आर. डी. उंदीरवाडे, बी. वाय. जांभुळकर, आर. एन. कऱ्हाडे, सी. आर. इंगळे, एस. एम. डांगे, पी. डी. तालन, एम. के. हजारे, एच. एस. गायकवाड, डब्ल्यू. व्ही. कृष्णाके, ए. आर. निशाने, फुलझेले, मुरमुरवार, भोजराज कान्हेकर उपस्थित होते.
जि. प . शाळा, कटेझरी - समितीचे अध्यक्ष राजू मडावी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कवडू धंदरे, प्रतापशहा मडावी, सुभाष धुळसे अंजली इष्टाम, रेखा बावणे, शुभांगी धुळसे, निर्मला धुळसे, चंदा मेश्राम, भाऊराव कोवे, आनंद धुळसे, सुखदेव देबलवार, हरिदास धुळसे, बनाजी धंदरे, अनिता चौधरी, मुक्ता मेश्राम, सुनीता कत्रोजवार, कांक्षणा मेटे, तारा बावणे, लक्ष्मी नैताम, सपना धुळसे, बुधाबाई बुरेवार, तामदेव धुळसे, मनोहर इष्टाम, सुनील धुळसे, पत्रूजी धंदरे उपस्थित होते. मुख्याध्यापक सहारे, सांगसूरवार यांनी सहकार्य केले.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पेटतळा - समितीचे अध्यक्ष गोविंदा शेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच रमेश कन्नाके, जयंद्र बर्लावार, सुरेंद्र गेडाम, ज्योती कन्नाके, वासुदेव कुनघाडकर, पुरूषोत्तम किरमे, सडमेक, अल्का दर्राे, निर्मल पवार, बाळापुरे, कोडापे, शुभांगी सुरणवार, दुधबावरे, विजया लाकडे, सुरेखा तुंकलवार, कल्पना राजूरवार, सुनीता हवलादार, गोलदार, अनिल कोसरे, हरिदास येरेवार, भगवान बर्लावार, शुभांगी चौधरी, साहिल बर्लावार उपस्थित होते.
जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा, कुरखेडा - समितीचे अध्यक्ष सिराज पठाण यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच चावडी वाचन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जमील शेख, जावेद शेख, फारूख खान, मुख्याध्यापिका अर्निसा कुरेशी, तस्लिमा खान, शहेला सय्यद उपस्थित होत्या. (लोकमत न्युज नेटवर्क)