‘आधार’च्या नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालयी धाव
By Admin | Updated: December 29, 2014 23:42 IST2014-12-29T23:42:13+5:302014-12-29T23:42:13+5:30
गेल्या चार-पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक आधार कार्ड नोंदणी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे आधार कार्ड नोंदणीसाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. असाच काहीसा

‘आधार’च्या नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालयी धाव
गडचिरोली : गेल्या चार-पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक आधार कार्ड नोंदणी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे आधार कार्ड नोंदणीसाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. असाच काहीसा प्रकार एटापल्ली तालुक्यातील कसनसूरजवळील झुरी येथील आदिवासी नागरिकांच्या संदर्भात घडला. एटापल्लीतील आधार कार्ड नोंदणी केंद्र बंद झाल्यामुळे झुरी येथील ४० ते ५० आदिवासी नागरिकांनी भाड्याचे वाहन करून जिल्हा मुख्यालय असलेले गडचिरोली शहर गाठले व नोंदणीसाठी रांगेत लागले.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ १९ आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. मात्र हे सारे केंद्र शहराच्या ठिकाणी आहे. ग्रामीण व दुर्गम भागात गेल्या अनेक महिन्यांपासून आधार कार्ड नोंदणी केंद्राची व्यवस्था नाही. शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. याशिवाय गॅस कनेक्शन बँक खाता तसेच शिष्यवृत्तीसाठी आधार कार्डची झेराक्स प्रत जाडणे आवश्यक आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी व अन्य नागरिक आधार कार्ड नोंदणीकरीता गेल्या काही दिवसांपासून शहराकडे धाव घेत आहे. यामुळे प्रवासाच्या माध्यमातून त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)