जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला
By Admin | Updated: February 11, 2017 01:45 IST2017-02-11T01:45:33+5:302017-02-11T01:45:33+5:30
२४ फेब्रुवारी शुक्रवारपासून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला
मार्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा
विविध सुविधा राहणार : २४ तास वीज पुरवठ्याची सोय
चामोर्शी : २४ फेब्रुवारी शुक्रवारपासून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे. सदर यात्रेदरम्यान भाविकांना त्रास होऊ नये या दृष्टीने प्रशासनातर्फे विविध सुविधा देण्यात येणार आहे. मार्र्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी गुरूवारी मार्र्कंडादेव येथे घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी आढावा बैठकीला प्रामुख्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.चे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपादे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवळे, भारतीय पुरातत्व विभाग नागपूरचे उपअधीक्षक डॉ. हाशमी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, पोलीस निरिक्षक किरण अवचर, संवर्ग विकास अधिकारी खामकर आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी नायक यांनी बांधकाम, विद्युत, आरोग्य, परिवहन, वन विभाग आदींकडून मार्र्कंडा यात्रेच्या तयारीची व भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. बैठकीला मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, रामप्रसाद महाराज, मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, सचिव अशोक तिवारी, उपाध्यक्ष रामेश्वर काबरा, मार्र्कंडादेवच्या सरपंच ललिता म्हरस्कोल्हे, विश्वस्त हरीभाऊ खिनखीनकर, गोपाल रणदिवे महाराज आदी उपस्थित होते. आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्न पदार्थाची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी केली जाणार आहे. तसेच विद्युत पुरवठा २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
यंदा प्रथमच शिवलिंगाचे थेट प्रक्षेपण होणार
मार्र्कंडादेव येथे मंदिर परिसर प्रवेश रांगा, पार्र्किं ग तसेच यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची नजर राहणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच यात्रेदरम्यान शिवलिंगाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून भाविक रांगेत असलेल्या ठिकाणाहून हे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. तसेच लाईव्ह वेबकास्ट सुध्दा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ओटी टेस्टद्वारे दररोज दोनवेळा केली जाणार आहे.
अशी राहणार व्यवस्था
यात्रे दरम्यान मार्र्कंडादेव येथील पोलीस चौकात एक खोयापाया कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यात हरविलेल्या व सापडलेल्या बालकांची नोंद घेण्यात येणार आहे. वैनगंगा नदीतील धोकादायक ठिकाणी लाल पताके व थर्माकॉल लावण्यात येणार आहे. स्तनदा माता, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी एक विशेष प्रवेश रांग राहिल. महिलांना आंघोळीसाठी दोन बंदिस्त कक्ष शॉवर व्यवस्थेसह राहतील. आरोग्याच्या दृष्टीने रूग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येणार असून महिला डॉक्टर राहिल.