कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने जिल्हा कचेरी दणाणली
By Admin | Updated: September 3, 2015 00:53 IST2015-09-03T00:53:32+5:302015-09-03T00:53:32+5:30
देशातील प्रमुख १० कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातही जोरदार प्रतिसाद मिळाला.

कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने जिल्हा कचेरी दणाणली
२५ संघटना सहभागी : कार्यालयीन कामकाजावर झाला परिणाम; संघटनांचे पदाधिकारी सरकारच्या धोरणाविरोधात गरजले
गडचिरोली : देशातील प्रमुख १० कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातही जोरदार प्रतिसाद मिळाला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध आस्थापनातील काम बुधवारी दिवसभर ठप्प राहिले. हजारो कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विविध संघटनांच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर प्रखर टीका केली.
गडचिरोली जिल्ह्यात या संपामध्ये जवळजवळ २५ संघटना सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, आयटक या प्रमुख संघटनांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, कार्याध्यक्ष राजकुमार पारधी, उपाध्यक्ष साईनाथ दुम्पट्टीवार, कल्पना रामटेके, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, उपाध्यक्ष व्ही. गंजीवार, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, मंगला बिरणवार, श्रीकृष्ण पेंदाम, संजय खोकले, आशिक भोयर, जि. प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर कोरंटलावार, सचिव गजानन दहिकर, अभियंता संघटनेचे अध्यक्ष दिलीप गौरकार, नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, सचिव ज्योती कावरे, कृषी तांत्रिक संघटनेचे पी. पी. राऊत, लिपिकवर्गीय संघटनेचे अध्यक्ष व्ही. व्ही. कंबगौणी, सचिव फिरोज लांजेवार, जि. प. महिला समितीच्या अध्यक्ष कविता साळवे, सचिव माया बाळराजे, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटनेच्या सचिव वृंदा आखाडे, चतुर्थ श्रेणी संघटनेचे कैलास भोयर, राजू रेचनकर, विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भय्याजी मुद्देमवार, सचिव ज्ञानेश्वर भोगे, लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश कोत्तावार, सचिव बलराज जुमनाके, शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दीपक देवतळे, रेखाचित्र संघटनेचे सचिव दुधबळे, वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष रफिक शेख, सचिव मारोती नांदे, पशुधन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. जे. उईके, सचिव जी. काटवे, जि. प. प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद कावटवार, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार, नरेंद्र कोत्तावार, रमेश रामटेके, लालचंद धाबेकर, सचिव अमरसिंग गेडाम, जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खरवडे, सचिव विनोद सोनकुसरे, जि. प. पदविधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजू घुगरे, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजू आकेवार, अंशकालीन महिला परिचर आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष रेखा सहारे, सादरा शेख, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष एस. के. चडगुलवार, कार्याध्यक्ष ए. आर. गडप्पा, सरचिटणीस व्ही. एम. सवरंगपते, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के आदी उपस्थित होते. त्यानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना निवेदन सादर केले. यावेळी आयटकच्या महिलाही मोर्चात सहभागी होत्या.