जिल्हा बँकेने पटकाविला माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:11 IST2018-09-13T00:10:06+5:302018-09-13T00:11:41+5:30
बँकिंग फ्रंटीयरतर्फे दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०१७-१८ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार देऊन बँकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

जिल्हा बँकेने पटकाविला माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बँकिंग फ्रंटीयरतर्फे दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०१७-१८ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार देऊन बँकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला नाबार्ड सरव्यवस्थापक रामचंद्रन, विदर्भ बँकेचे माजी गव्हर्नर आर.गांधी, विदर्भ बँकेचे संचालक व सहकारी भारतीचे संचालक सतीश मराठे, नाबार्ड व्यवस्थापक मणीकुमार आदी उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञानाचा सदर पुरस्कार बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर, आयटी विभागाचे उपव्यवस्थापक हर्षवर्धन भडके आदींनी स्वीकारला.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, पदाधिकारी, संचालक आदींनी जिल्ह्यातील शेतकरी, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, व्यापारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बचतगट व ग्राहकांचे आभार मानले आहे.