कमलापुरात विविध दाखल्यांचे वाटप
By Admin | Updated: March 14, 2015 00:07 IST2015-03-14T00:07:08+5:302015-03-14T00:07:08+5:30
महसूल विभागाच्या वतीने बुधवारी समाधान शिबिराचे आयोजन कमलापूर येथे करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कमलापुरात विविध दाखल्यांचे वाटप
कमलापूर : महसूल विभागाच्या वतीने बुधवारी समाधान शिबिराचे आयोजन कमलापूर येथे करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
समाधान शिबिराला अहेरीचे तहसीलदार के. वाय. कुणारपवार, नायब तहसीलदार व्ही. एस. सिलमवार, एस. के. संतोषवार, व्ही. एम. गुरू, एल. एम. पेंदाम, मंडळ अधिकारी पी. जी. शेंडे, ग्रा. प. सचिव एल. के. पाल उपस्थित होते. यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्यानंतर शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. विविध योजनांचा लाभासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचे अर्ज भरण्यात आले. दरम्यान आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच विविध योजनांचा लाभासाठी अर्ज वितरित करून ते भरून घेण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने शेतकरी व निराधारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच नागरिकांमध्ये योजनेची जागृती करावी, असे आवाहन तहसीलदार के. वाय. कुणारपवार यांनी केले. आधार कार्ड नोंदणी करून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सिलमवार यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)