भात रोवणी यंत्राचे वितरण
By Admin | Updated: August 22, 2015 01:52 IST2015-08-22T01:52:38+5:302015-08-22T01:52:38+5:30
राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी गटांना रोवणी यंत्राचे वितरण शुक्रवारी करण्यात आले.

भात रोवणी यंत्राचे वितरण
कृषी विभागाचा उपक्रम : कृषी आयुक्तांची उपस्थिती
गडचिरोली : राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी गटांना रोवणी यंत्राचे वितरण शुक्रवारी करण्यात आले. त्याचबरोबर साखरा व शिवणी येथे जाऊन भात रोवणी यंत्राच्या लागवडीबाबतची माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, कृषी सभापती अजय कंकडालवार, अप्पर जिल्हाधिकारी आव्हाड, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, कृषी विकास अधिकारी संजय सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी शेरेन पठाण, कावेरी राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी साखरा येथे यंत्राणे लागवड केलेल्या शेताची पाहणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत यांत्रिकीकरणाबाबत चर्चा केली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मागासला समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक यंत्रांचा वापर केला जात आहे. भात रोवणीसाठी यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.