राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पीपीई कीटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST2021-05-06T04:38:54+5:302021-05-06T04:38:54+5:30

गडचिराेली : राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्हा गडचिराेलीच्यावतीने स्थानिक नगर पालिकेतील सफाई कामगार, आराेग्य व इतर कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट उपलब्ध करून ...

Distribution of PPE kits from NCP | राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पीपीई कीटचे वाटप

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पीपीई कीटचे वाटप

गडचिराेली : राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्हा गडचिराेलीच्यावतीने स्थानिक नगर पालिकेतील सफाई कामगार, आराेग्य व इतर कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट उपलब्ध करून देण्यात आल्या. पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेड यांच्याहस्ते सफाई कामगार व कर्मचाऱ्यांना १० पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.

गडचिराेली शहरात व जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. अशा भयावह परिस्थितीत सफाई कर्मचारी घराेघरी जाऊन कचरा संकलन, फवारणी, शववाहिकेतून मृत रुग्णांना अंत्यविधीस्थळी नेणे आदी काम करीत आहेत. अशाच परिस्थितीत नगर पालिकेल्या काेविड याेद्ध्यांना काेराेनाची लागण हाेऊ नये, त्यांचे आराेग्य सुदृढ राहावे, यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. न.प.च्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच २०० पीपीई कीट उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राकाॅंचे जिल्हाध्यक्ष याेगेश नांदगावे यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा सचिव संजय काेचे, शहर अध्यक्ष विजय धकाते, उपाध्यक्ष कपिल बागडे आदी उपस्थित हाेते.

===Photopath===

050521\05gad_6_05052021_30.jpg

===Caption===

न.प.च्या कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करताना मुख्याधिकारी संजीव ओहाेड.

Web Title: Distribution of PPE kits from NCP