२०० विद्यार्थिनींना पॅडचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:36 IST2021-03-19T04:36:07+5:302021-03-19T04:36:07+5:30

धानाेरा : जाेडाे इंडिया साेशल फाऊंडेशन, पुणे व अभिनव बहुउद्देशीय कला मंच, गडचिराेली यांच्यातर्फे धानाेरा येथील प्रियदर्शनी विद्यालयातील २०० ...

Distribution of pads to 200 students | २०० विद्यार्थिनींना पॅडचे वाटप

२०० विद्यार्थिनींना पॅडचे वाटप

धानाेरा : जाेडाे इंडिया साेशल फाऊंडेशन, पुणे व अभिनव बहुउद्देशीय कला मंच, गडचिराेली यांच्यातर्फे धानाेरा येथील प्रियदर्शनी विद्यालयातील २०० विद्यार्थिनींना पुन्हा उपयाेगी सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष लीना साळवे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जयश्री लाेखंडे हाेत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पाेलीस निरीक्षक अंजली राजपूत, माजी नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, प्रा. सुनीता ढवस, प्रा. नीता भैसारे, स्त्रीराेग तज्ज्ञ डाॅ. गीता गेडाम, अभिनव बहुउद्देशीय कला मंचचे सचिव अकील शेख उपस्थित हाेते.

डाॅ. गेडाम यांनी सॅनिटरी पॅड वापराबाबत माहिती तसेच वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीमध्ये हाेणारे बदल याविषयी माहिती दिली. वंदना गुरनुले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अमर कुळमेथे, विलास मडावी, हाेमचंद गाेवारे, पूजा माडे, रिना लेनगुरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Distribution of pads to 200 students