लखमापूर येथे साहित्य वाटप व आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:44 IST2021-09-08T04:44:22+5:302021-09-08T04:44:22+5:30
कोरोना जनजागृती विषयक चित्रफित दाखवून सर्वांना लस व त्यासंबंधी काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे, यावर काशिनाथ देवगडे यांनी यावेळी ...

लखमापूर येथे साहित्य वाटप व आरोग्य तपासणी
कोरोना जनजागृती विषयक चित्रफित दाखवून सर्वांना लस व त्यासंबंधी काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे, यावर काशिनाथ देवगडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. हेमराज मसराम यांनी लोकांना कोरोनाची लक्षणे कोणती? त्यावर घ्यावयाची काळजी व त्यावर उपाय म्हणून लस घेणे हाच सध्या प्रभावी उपाय असून, तिचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे सर्वांनी लस घेतलीच पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परिचारिका सुजाता बोलीवार, सरपंच किरण सुरजागडे, सदस्य भाग्यवान पिपरे व संस्था समन्वयक आशिष करमणकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजत देवगडे, रामचंद्र सत्तरवार तर स्वयंसेवक म्हणून मुनेश कोहळे, दिलखुश बोदलकर, आशिष कोहळे,अंकुश सातपुते व मुलींमध्ये सीमा दुधबळे, ओजस्वी दुधबळे, पायल सातपुते, काजल सातपुते यांनी सहकार्य केले. या सर्व स्वयंसेवकांना संस्थेमार्फत मास्क व टी शर्टचे वाटप करण्यात आले. आभार रामचंद्र सत्तरवार यांनी मानले.