शिवजयंतीनिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST2021-02-22T04:25:53+5:302021-02-22T04:25:53+5:30

जिमलगट्टा : उपपाेलीस स्टेशनच्या वतीने जिमलगट्टा येथे शिवजंयती साेहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे ...

Distribution of masks and sanitizers on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप

शिवजयंतीनिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप

जिमलगट्टा : उपपाेलीस स्टेशनच्या वतीने जिमलगट्टा येथे शिवजंयती साेहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन गाेविंदगावचे सरपंच तिरुपती अल्लुरी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वन परिक्षेत्राधिकारी दादाजी नगराळे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पाेलीस अधिकारी राहुल गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डाॅ.संगीता मेडी, डाॅ.साईश उपगन्लावार, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनीता भगत, पत्रकार संजय गज्जलवार, महेश मद्देलवार, पाेलीस निरीक्षक जाधव, पाेलीस उपनिरीक्षक बुधावले, पाेलीस पाटील नंदिनी कांबळे उपस्थित हाेते. कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांना विविध शासकीय याेजनांची माहिती देण्यात आली. त्यानंतर, उपविभागीय पाेलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, उपपाेलीस स्टेशनच्या वतीने जिमलगट्टा येथे १६ व १७ फेब्रुवारीला बिरसामुंडा व्हाॅलीबाॅल व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या हाेत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना एसडीपीओ गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपपाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देवानंद बगमारे, पीएसआय बालाजी मेटे, सागर देवकर, तसेच पाेलीस जवानांनी सहकार्य केले. सहभाेजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Web Title: Distribution of masks and sanitizers on the occasion of Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.