यंकाबंडात गरजूंना साहित्याचे वितरण
By Admin | Updated: March 21, 2015 01:53 IST2015-03-21T01:53:19+5:302015-03-21T01:53:19+5:30
उपपोलीस ठाण्यांतर्गत यंकाबंडा येथे मंगळवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यंकाबंडात गरजूंना साहित्याचे वितरण
जिमलगट्टा : उपपोलीस ठाण्यांतर्गत यंकाबंडा येथे मंगळवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील गरजूंना विविध साहित्य व महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी अधिकारी मुसळे, गोविंदगावचे सरपंच परशुराम नाईनी, वनपाल घाबरगुंडे, एस. पी. गिलबिले, प्रीती करमे उपस्थित होत्या.
यावेळी आरोग्य विभाग, वनविभाग, महसूल विभागाच्या वतीने स्टॉल लावून विविध योजनांची माहिती तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने शिबिर आयोजित करून आरोग्य तपासणी करण्यात आली. यात विविध आजारांनी ग्रस्त आढळलेल्यांवर औषधोपचार करण्यात आला. दरम्यान गरजू महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. मेळाव्यानिमित्त रांगोळी, गोळाफेक, संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. गोविंदगाव व यंकाबंडा येथील क्रिकेट संघाला खेळाचे साहित्य देण्यात आले. पद्माकर देशपांडे यांनी वनाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. संचालन पीएसआय सौरभ घरडे तर आभार क्रिष्णा घुटके यांनी मानले. (वार्ताहर)