जीवनगट्टात साहित्य वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:41 IST2017-02-09T01:41:21+5:302017-02-09T01:41:21+5:30
सीआरपीएफ १९१ बटालीयनच्या वतीने सिव्हिक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत जीवनगट्टा येथे नागरिकांना तसेच

जीवनगट्टात साहित्य वितरित
सिव्हिक अॅक्शन कार्यक्रम : १९१ बटालीयनचा पुढाकार
एटापल्ली : सीआरपीएफ १९१ बटालीयनच्या वतीने सिव्हिक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत जीवनगट्टा येथे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप सोमवारी करण्यात आले.
सीआरपीएफ बटालीयनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमाला उपकमांडंट चंचल परवाना, निरीक्षक तोहीद आलम खान, उपनिरीक्षक एस. के. रावत, सहायक उपनिरीक्षक एम. के. म्हमाणे उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील अनेक कलाकारांनी कलागुण सादर केले. त्यानंतर कमांटंट प्रभाकर त्रिपाठी यांनी शिक्षण, रोजगार, विज्ञान, आरोग्य संदर्भातील शासकीय योजनांची माहिती दिली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपली प्रगती साधावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर गरजू नागरिकांना गृहपयोगी वस्तू तसेच गरीब महिलांना साड्या, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)