सीआरपीएफतर्फे साहित्याचे वितरण
By Admin | Updated: February 19, 2015 01:41 IST2015-02-19T01:41:15+5:302015-02-19T01:41:15+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालीयनच्या वतीने सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सावरगाव येथे रविवारी साहित्य वितरण ...

सीआरपीएफतर्फे साहित्याचे वितरण
धानोरा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालीयनच्या वतीने सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सावरगाव येथे रविवारी साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सावरगाव परिसरातील सहा गावातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला सीआरपीएफच्या ११३ बटालीयनचे अधिकारी पाटील, अमित कुमार, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे आदी उपस्थित होते. यामध्ये सोलर लाईट, बॉल, नेट, फुटबॉल, बॅटमिंटन, रॉकेट, कार्कनेट, कॅरम बोर्ड, रेडिओ, शालेय गणवेश, मच्छरदाणी तसेच स्कूल बॅग, नोटबूक, चित्रकला वही, टिफिन बॉक्स, स्केल, पेन आदींचा समावेश आहे. तालुक्यातील सावरगाव, कंकडी, मर्केगाव, मोरचुल, कुलभट्टी व पवनी आदी सहा गावातील नागरिकांनी साहित्य स्वीकारून शिबिराचा लाभ घेतला. (तालुका प्रतिनिधी)