जिल्हा रुग्णालयात आज आयुष्यमान भारत कार्ड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:42 IST2021-09-23T04:42:10+5:302021-09-23T04:42:10+5:30
२३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण भारतात ही याेजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांला प्रति वर्ष प्रति कुटुंब ५ ...

जिल्हा रुग्णालयात आज आयुष्यमान भारत कार्ड वाटप
२३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण भारतात ही याेजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांला प्रति वर्ष प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत १२०९ आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार मोफत आहेत. त्याकरिता लाभार्थ्यांचे नाव सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणना २०११ मध्ये असणे आवश्यक आहे. आयुष्यमान भारत मदत केंद्र, यूटीआय केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. गरजू लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आयुष्यमान भारत कार्ड बनवावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिल रुडे यांनी केले आहे. महात्मा जाेतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना आदींच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ५७६ रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार माेफत झाला आहे. तसेच १ लाख ५ हजार ४२४ आयुष्यमान भारत कार्डचे वाटप नागरिकांना झालेले आहे.