शेतकऱ्यांना वारस नोंदी प्रमाणपत्राचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:17+5:302021-03-13T05:06:17+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी तालुक्याचे तहसीलदार जितेंद्र शीकतोडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, भेंडाळाच्या ...

Distribution of heir registration certificates to farmers | शेतकऱ्यांना वारस नोंदी प्रमाणपत्राचे वितरण

शेतकऱ्यांना वारस नोंदी प्रमाणपत्राचे वितरण

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी तालुक्याचे तहसीलदार जितेंद्र शीकतोडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, भेंडाळाच्या सरपंच कुंदा जुवारे, उपसरपंच विठ्ठल सातपुते, पोलीसपाटील श्रीरंग म्हशाखेत्री, तलाठी सेडमाके, कोतवाल मोरेश्वर साखरे हे उपस्थित होते. जे शेतकरी मृत झाले आहेत त्यांच्या वारसांची नावे सातबारावर चढविण्यात आली. मृत खातेदारांची नोंदी ६ क वर घेऊन प्रमाणित करण्यात आले. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. मंडळ अधिकारी गौतम फुलझले यांनी प्रास्ताविक केले, तर तलाठी शेडमाके यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला भेंडाळा ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सदस्य संजय चलाख, कुसूम उंदीरवाडे, वर्षा सातपुते, निखिल उंदीरवाडे, गीता तुंबळे, ज्योती नंदेश्वर, गुरुदेव डांगे, तसेच दोटकुलीचे शेतकरी मधुकर बोदलकर हजर हाेते.

Web Title: Distribution of heir registration certificates to farmers