धान, भाजीपाला बियाणांसह गॅस सिलिंडरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:05+5:302021-07-17T04:28:05+5:30

कृषी मेळाव्याला उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मदन मस्के, पीएसआय दीपक पारधे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओमप्रकाश लांजेवार, कृषी सहायक ...

Distribution of gas cylinders with grains, vegetables and seeds | धान, भाजीपाला बियाणांसह गॅस सिलिंडरचे वाटप

धान, भाजीपाला बियाणांसह गॅस सिलिंडरचे वाटप

कृषी मेळाव्याला उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मदन मस्के, पीएसआय दीपक पारधे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओमप्रकाश लांजेवार, कृषी सहायक शेडमाके, वनपरिक्षेत्र अधिकारी झाडे, वनरक्षक पारधे, तलाठी अश्विन तलांडी, राहुल पोरतेट, इचकापे, ग्रामसेवक राठाेड, मेश्राम, जाफ्राबादचे सरपंच बापू सडमेक, व्यंकटापूरचे सरपंच अजय आत्राम, गर्कापेठाचे सरपंच सूरज गावडे, मादारामच्या सरपंच सरिता गावडे व शेतकरी उपस्थित हाेते. कृषी मेळाव्याच्या आयाेजनामागील भूमिका प्रभारी अधिकारी मस्के यांनी सांगितली, तर महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तलाठी अश्विन तलांडी यांनी दिली. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओमप्रकाश लांजेवार यांनीही शासकीय याेजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषी मेळाव्यात प्रगतशील शेतकरी राजेश्याम मलय्या कासेट्टी व मलय्या संगर्ती यांचा सत्कार करण्यात आला. कासेट्टी व संगर्ती यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक व फायद्याची शेती करावी, असे आवाहन पीएसआय दीपक पारधे यांनी केले.

याप्रसंगी उपपाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ५५ शेतकऱ्यांना धान बियाणे, ५२ शेतकऱ्यांना तूर बियाणांचे व ३२ शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणांचे वाटप करण्यात आले. याशिवाय वनविभागाकडून १० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. याशिवाय विविध प्रकारच्या फळझाडांच्या राेपट्यांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक संभाजी मुंडे, पाेलीस नाईक शंकर आत्राम, पाेलीस शिपाई रवीकुमार सदनपू, प्रदीप आत्राम व कर्मचारी उपस्थित हाेते. सहभाेजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Web Title: Distribution of gas cylinders with grains, vegetables and seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.