शेतकऱ्यांना मोफत शेतीपयोगी साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:58+5:302021-07-17T04:27:58+5:30
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, ...

शेतकऱ्यांना मोफत शेतीपयोगी साहित्य वाटप
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन नायब तहसीलदार जे. जी. काळजीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्राम विकास अधिकारी डी. एन. श्रीरामे, बी.डी. चौधरी, एम.टी. लोंढे, घोंगडे, लोखंडे, मल्लेवार, सरपंच ललिता मडावी, सरपंच विलास गावडे, कृषी पर्यवेक्षक होडवे, पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश सिंग, पीएसआय सुरेश पोटे तसेच हद्दीतील पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, रोजगार सेवक, कोतवाल हजर हाेते.
पोलीस अधिकारी व मान्यवरांनी उपस्थित जनतेला शासनाच्या विविध योजनेबाबत माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. मेळाव्यामध्ये हद्दीतील १५ शेतकऱ्यांना धान बियाणे (१०१० ठोकळ), ७० शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे (चवळी, वांगी, दोडके, भेंडी, मिरची, टमाटे, काकडी), ३१ शेतकऱ्यांना शेती उपयुक्त अवजारे (टोपली, फावडे) वाटप करण्यात आले. तसेच ८२ लोकांचे जॉब कार्ड साठी कागदपत्रे घेण्यात येऊन १९ लोकांना जॉब कार्ड वाटप करण्यात आले. १७ पॅन कार्ड वाटप करण्यात आले, ३० आधार कार्ड, २ बँक खाते काढण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी कैलाश आलुरे पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, संदीप व्हसकोटी व पोलीस अंमलदार तसेच २५० ते ३०० महिला पुरुष उपस्थित होते.
150721\4017img-20210714-wa0031.jpg
बुर्गी तील फोटो