सेवा सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना खतांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:15+5:302021-06-06T04:27:15+5:30
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषदेचे सदस्य राम मेश्राम, नगरसेवक तथा ...

सेवा सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना खतांचे वितरण
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषदेचे सदस्य राम मेश्राम, नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, नंदू वाईलकर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शरद पाटील ब्राह्मणवाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना वडेट्टीवार म्हणाले, युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ५ ते ११ जूनदरम्यान 'सेवा सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान दररोज विविध घटकांतील नागरिक व महिलांना साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
युवक काँग्रेसच्या वतीने मागील ४६ दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पुढे खरीप हंगाम लक्षात घेऊन युवक कॉंग्रेसने शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. युवक काँग्रेसचा हा उपक्रम काँग्रेस सेवाव्रती असल्याचे दाखवून देणारा आहे, असे प्रतिपादन यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी केले.
या सेवा सप्ताहाच्या यशस्वितेसाठी संजय चन्ने, गौरव ऐनप्रेड्डीवार, कुणाल ताजणे, तौफिक शेख, प्रतीक बारसिंगे, जितेंद्र मुनघाटे, घनश्याम मुरवतकर, रोहित निकुरे, शरद भरडकर, मारोती लाकडे, पुरुषोत्तम समर्थ, संतोष मोहुर्ले, राजेंद्र ठाकरे, मंगरू मोहुर्ले, पुरुषोत्तम मांदाडे, महेंद्र पगाडे, चिमणाजी करकाडे, माधव मंगर आदी सहकार्य करीत आहेत. या कार्यक्रमाचे संचालन व आभार महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.