दिव्यांगांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:08+5:302021-03-13T05:06:08+5:30

यावेळी पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले, उपसभापती शेवंता अवसरे, माजी सभापती मोहन गायकवाड, सदस्य गोपाल उईके, अशोक नंदेश्वर, अर्चना ...

Distribution of essential materials to the disabled | दिव्यांगांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप

दिव्यांगांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप

यावेळी पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले, उपसभापती शेवंता अवसरे, माजी सभापती मोहन गायकवाड, सदस्य गोपाल उईके, अशोक नंदेश्वर, अर्चना ढोरे, संवर्ग विकास अधिकारी एस.एस. सलाम, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उमेश्चंद्र चिलबुले आदी उपस्थित होते. दरम्यान, केंद्र शासनाच्या या लोकाभिमुख योजने अंतर्गत अपंगांना तीनचाकी सायकल, कृत्रिम पाय, आंधळ्यांसाठी ब्रेलकिट, ब्रेलस्लेट, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट केन, स्मार्ट फोन, शालेय विद्यार्थ्यांसाठी डेझी प्लेयर, ट्रायसीकल, व्हिलचेअर छोटी-मोठी, सर्व आकाराच्या कुबड्या, सिपी चेयर, कॅलिबर, मुक्या-बहिऱ्यांना कानाची मशीन, गतिमंद मुलांसाठी एमएसईआयडी किट असे एकूण २६ प्रकारच्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर साहित्याचे वाटप करण्याकरिता दिल्लीची चमू दाखल झाली होती. पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून सदर योजनेचा लाभ देण्यात आला.

Web Title: Distribution of essential materials to the disabled