काैशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:46+5:302021-02-23T04:54:46+5:30
कुरखेडा : स्थानिक श्री गाेविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयातील राेजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री काैशल्य विकास याेजनेंतर्गत विद्यार्थ्यांना ...

काैशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप
कुरखेडा : स्थानिक श्री गाेविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयातील राेजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री काैशल्य विकास याेजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात १५० विद्यार्थी सहभागी झाले हाेते. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आभासी पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष तथा प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे, प्रधानमंत्री काैशल्य विकास याेजना नागपूरचे विभागीय समन्वयक अखिल अग्रवाल, नीता अग्रवाल उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भास्कर तुपटे, संचालन डाॅ. दीपक बन्साेड तर आभार प्रा. डाॅ. रवींद्र विखार यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य पी. एस. खाेपे, प्रा. डाॅ. संजय महाजन, प्रा. निकेश लाेखंडे, प्रा. डाॅ. अनिल भाेयर, प्रा. प्रमेश दाणी, वासुदेव गुठेकर उपस्थित हाेते.