नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:43+5:302021-03-24T04:34:43+5:30
यावेळी उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक केशव केंद्रे ...

नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वितरण
यावेळी उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक केशव केंद्रे तसेच एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक पठाण यांच्यासह पोलीस अंमलदार व एसआरपीएफचे अंमलदार उपस्थित होते.
दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. ज्या नागरिकांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. अशा नागरिकांनी पोलीस स्टेशनला कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
अहेरी उपविभागात बहुतांश भाग नक्षलग्रस्त व दुर्गम आहे. या गावामधील अनेक नागरिकांकडे अद्यापही जात प्रमाणपत्र नव्हते. पोलिसांच्या पुढाकाराने जात प्रमाणपत्र वितरित केले जात आहेत. तसेच पोलीस स्टेशन परिसरातील लोकांना शिधापत्रिका, आधारकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असल्याने परिसरातील लोकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले.