कुकडीतील महिलांना केनोपी छत्री व वजन काट्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST2021-05-24T04:35:30+5:302021-05-24T04:35:30+5:30

आरमोरी : तालुक्यातील कुकडी येथील मोहा लाडू व त्यावरील प्रक्रिया उद्योग या व्यवसाय गटाला माविमचे सहायक सनियंत्रण अधिकारी ...

Distribution of canopy umbrellas and weighing scales to the women in the hen | कुकडीतील महिलांना केनोपी छत्री व वजन काट्याचे वितरण

कुकडीतील महिलांना केनोपी छत्री व वजन काट्याचे वितरण

आरमोरी : तालुक्यातील कुकडी येथील मोहा लाडू व त्यावरील प्रक्रिया उद्योग या व्यवसाय गटाला माविमचे सहायक सनियंत्रण अधिकारी सचिन नरुले यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पातील महिलांना केनोपी (छत्री) व वजन काट्याचे वितरण करण्यात आले.

पाच महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सप्टेंबर महिन्यात कर्ज वाटप करण्यात आले होते. कर्ज घेऊन महिलांनी व्यवसाय उभारला असून सदर महिला कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. कोरोनाकाळातही या व्यवसायातून सदर महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याप्रसंगी कुकडीच्या पोलीस पाटील सविता किरंगे, लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक यामिनी मातेरे, सहयोगिनी विशाखा सोनटक्के, लेखापाल सुरेश बावनकर, रूपाली कुमरे, ताराबाई कुमरे आदी उपस्थित होत्या.

===Photopath===

230521\img-20210521-wa0067.jpg

===Caption===

कुकडी येथील व्यावसायिक महिलांना केनोपी व वजन काट्याचे वाटप करताना

Web Title: Distribution of canopy umbrellas and weighing scales to the women in the hen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.