देसाईगंजात गरजूंना ब्लॅंकेटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:25 IST2021-06-11T04:25:06+5:302021-06-11T04:25:06+5:30
देसाईगंज : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांचे देसाईगंज शहरात आगमनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात ...

देसाईगंजात गरजूंना ब्लॅंकेटचे वितरण
देसाईगंज : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांचे देसाईगंज शहरात आगमनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा माेटवानी व नगरसेवक हरीश माेटवानी यांच्याकडून गरजू नागरिकांसाठी ब्लॅंकेट उपलब्ध करून देण्यात आले. या ब्लॅंकेटचे वितरण नाना पटाेले व विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच देसाईगंज शहरात नाना पटाेले यांचे आगमन झाले. यानिमित्त पटाेले व वडेट्टीवार यांचा जेसा माेटवानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या डाॅक्टर सेलचे सरचिटणीस डाॅ. प्रमाेद साळवे, ॲड. संजय गुरू, माजी सभापती परसराम टिकले, आरती लहरी, हंसा खाेब्रागडे, राजू पतरंगे, मेरी विल्सन, हिरा चांदेवार, लंकेश बेदरे, उमेश तुपट, गाैरव खिलवानी, वैजनाथ तुपट, विजय तुपट, कपील बाेरकर, दिनेश काेल्हे, विनीत ठेंगरे आदी उपस्थित हाेते.