तंटामुक्त पुरस्कार रकमेतून शैक्षणिक साहित्यांचे वाटप

By Admin | Updated: July 2, 2015 02:10 IST2015-07-02T02:10:19+5:302015-07-02T02:10:19+5:30

येथून दीड किमी अंतरावर असलेल्या चिंचगुडी गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला मिळालेल्या...

Distribution of academic literature from a non-award award | तंटामुक्त पुरस्कार रकमेतून शैक्षणिक साहित्यांचे वाटप

तंटामुक्त पुरस्कार रकमेतून शैक्षणिक साहित्यांचे वाटप

चिंचगुडी समितीचा उपक्रम : २२० स्कूल बॅग व १३० टिफीन डबे दिले
अहेरी : येथून दीड किमी अंतरावर असलेल्या चिंचगुडी गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला मिळालेल्या पुरस्कार रकमेतून ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व टिफीन बॉक्सचे वाटप अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस यांच्या हस्ते करण्यात आले.
चिंचगुडी गावाला सन २०१३-१४ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. या रकमेतून २२० स्कूल बॅग व १२० टिफीन बॉक्स विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तर अंगणवाडीतील बालकांना टिफीन डबे देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचगुडी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रभाकर तोगरवार होते. उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर, गटशिक्षणाधिकारी व्ही. जी. गिऱ्हे, चिंचगुडीचे सरपंच रमेश मडावी, उपसरपंच स्वाती येनगंटीवार, माजी सरपंच बापू आत्राम, प्रमोद गिलेटी, तेजस्वीनी कोलावार, बापू तोडेट्टी, मुख्याध्यापक नामनवार, दिनेश येनगट्टीवार, राजन्ना कोलावार, कुरेशी, तिरूपती पाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख एन. बी. चालुरकर, प्रास्ताविक ग्रामसचिव व्यंकटरमन गंजीवार, आभार प्रमोद गोलेटी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Distribution of academic literature from a non-award award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.