पोलीस मदत केंद्राच्यावतीने नागरिकांना ३०० झाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:08+5:302021-07-03T04:23:08+5:30
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून ...

पोलीस मदत केंद्राच्यावतीने नागरिकांना ३०० झाडांचे वाटप
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र, घोट हद्दीतील बेलगट्टा या गावातील नागरिकांना पोलीस मदत केंद्राच्यावतीने ३०० झाडांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पोलीस मदत केंद्र, घोटचे प्रभारी अधिकारी एस. एम. रोंढे यांनी फळझाडांचे व वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. गडचिरोली जिल्ह्यातील वाढते कुपोषण व आहारातील फळांचे महत्त्व सांगून गडचिरोली पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र घोटच्यावतीने काजू, बदाम, फणस, चिंच, चिकू व आंबा आदी फळझाडांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे व अंमलदार उपस्थित होते.