गुरेकसा येथे साहित्य वितरित

By Admin | Updated: December 21, 2015 01:31 IST2015-12-21T01:31:11+5:302015-12-21T01:31:11+5:30

धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या गुरेकसा येथे नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांना विविध वस्तूंचे वाटप पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

Distribute literature at Gurekasa | गुरेकसा येथे साहित्य वितरित

गुरेकसा येथे साहित्य वितरित

पोलिसांचा पुढाकार : नक्षल सदस्यांच्या कुटुंबाला मदत
मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या गुरेकसा येथे नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांना विविध वस्तूंचे वाटप पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
गुरेकसा येथील मंगलसिंग ऊर्फ विक्रम तुलावी, पत्नी दुल्लो मंगलसिंग तुलावी कसनसूर नक्षल दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच अनिता सूर्या जाळे, कपंनी- ४ दलमध्ये कार्यरत आहेत. टिपागड दलम कमांडर सावजी ऊर्फ अंकलू तुलावी, त्याची पत्नी कमला अंकलू तुलावी दलम सदस्य, प्लाटून दलम सदस्य चंपा ऊर्फ गीता नरोटे, टेकनिकल वर्कर, डिव्हिजन सदस्य शिवलाल ऊर्फ सुकलू पदा, पत्नी पुष्पा शिवलाल पदा आदी गुरेकसा या एकाच गावातील आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची प्रभारी अधिकारी सचिन गढवे, स्वप्नील भामरे, दानिश मन्सुरी यांनी भेट देऊन कुटुंबाला साडीचोळी, कपडे, मिठाई दिली. तसेच नवजीवन योजनेचे महत्त्व पटवून दिले. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही गढवे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Distribute literature at Gurekasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.