जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करा

By Admin | Updated: September 29, 2014 00:44 IST2014-09-29T00:44:57+5:302014-09-29T00:44:57+5:30

देशभरात प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी

Dissolve the district plastic pollution | जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करा

जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करा

गडचिरोली : देशभरात प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हा मराठी विज्ञान परिषद गडचिरोलीच्यावतीने जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी प्लास्टिकचा समूळ नायनाट झाला पाहिजे. सध्या जिल्हाभरात प्लास्टिकचा वापर वाढला असून अविघटीत प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मुक्या जनावरांच्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याला प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावित असेही जिल्हा मराठी विज्ञान परिषदेने निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी अविघटन होणाऱ्या ५० मॅकॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे मुळातच उत्पादन बंद होणे गरजेचे आहे. यासंदर्भात आपण शासनाशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देताना जिल्हा मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष संजय भांडारकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत भोंगळे, उपाध्यक्ष अनिल शेट्टे, कार्यवाह प्रशांत तम्मेवार, सहकार्यवाह तथा कोषाध्यक्ष देवेंद्र म्हशाखेत्री, गोरे, राकेश चटकुलवार, नरेंद्र उंदीरवाडे, विवेक हुलके, संजय नार्लावार, अविनाश गौरकार, राजेंद्र हिवरकर, सोनटक्के, गडपल्लीवार, पेरसिंगवार, संगनवार आदी उपस्थित होते.
जिल्हा मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनाही या मागणीचे निवेदन दिले आहे. जिल्हा प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्याकरिता प्लास्टिक प्रदूषण कमी करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्निर्मिती याबाबत जनजागृती करणे, तसेच यासंदर्भात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील विविध संघटना चळवळीच्या रूपाने कार्य करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Dissolve the district plastic pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.