पाेलीस भरती प्रक्रिया पुन्हा लांबल्याने इच्छुक तरुणांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:31+5:302021-01-10T04:28:31+5:30
सर्वाेच्च न्यायालयाने जनहित याचिकेनुसार, ९ सप्टेंबर २०२० राेजी अंतरिम आदेशाला स्थगिती दिलेली आहे. त्यानुसार २०१९ या वर्षातील पाेलीस शिपाई ...

पाेलीस भरती प्रक्रिया पुन्हा लांबल्याने इच्छुक तरुणांमध्ये नाराजी
सर्वाेच्च न्यायालयाने जनहित याचिकेनुसार, ९ सप्टेंबर २०२० राेजी अंतरिम आदेशाला स्थगिती दिलेली आहे. त्यानुसार २०१९ या वर्षातील पाेलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एसईबीसी प्रवर्गाकरिता आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी. यासंबंधी जाहिरातीत शुद्धीपत्रकाद्वारे आवश्यक सुधारणा करावी. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयाेमर्यादा लागू करून जे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करीत आहेत, अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घ्यावेत, असा शासन निर्णय गृह विभागाने ४ जानेवारीला काढला हाेता. या निर्णयामुळे एसईबीसी उमेदवारांवर अन्याय हाेणार हाेता. ही बाब ओळखून गृह विभागाने ४ जानेवारीचा शासन निर्णय रद्द करीत २३ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच शुद्धीपत्रक काढणार असल्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे, परंतु मागील दाेन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात पाेलीस भरती झाली नाही. पाच ते सहा महिन्यांपासून पाेलीस भरतीची जाेमात तयारी करणाऱ्या युवक व युवतींमध्ये शासनाच्या त्या निर्णयामुळे नाराजीचा सूर आहे.
बाॅक्स
३५० लाेकांमागे एक पाेलीस
गडचिराेली जिल्हा मागास व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाताे. जिल्ह्यात २२ पाेलीस स्टेशन आहेत. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात उपपाेलीस स्टेशन व मदत केंद्र आहेत. पाेलीस स्टेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण दिले जाते. सद्य:स्थितीत जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्या घरात आहे. त्यानुसार ३५० लाेकांमागे एक पाेलीस असल्याने पाेलीस यंत्रणेवर ताण आहे.
काेट....
मी लग्नाच्या पूर्वीपासून माेठी अपेक्षा बाळगून पाेलीस भरतीच्या शारीरिक व लेखी परीक्षेची सतत दाेन ते अडीच वर्षे सराव करून तयारी केली. लग्नानंतरसुद्धा मी पाेलीस शिपाई बनण्याचे स्वप्न कायम ठेवले. मात्र, निष्ठूर शासनाने पाेलीस भरती प्रक्रिया नियम व जीआरमध्ये रखडविली. नियमित तयारी करणाऱ्या युवावर्गाची त्यामुळे घाेर निराशा झाली. आता काेराेना महामारीचे संकट काही प्रमाणात कमी हाेत आहे. त्यामुळे शासनाने आता तरी पाेलीस भरती प्रक्रियेला मंजुरी द्यावी.
- राेशनी महामंडरे, गडचिराेली
काेट....
दुर्गम भाग असलेल्या परिसरातील अनेक आदिवासी व बिगर आदिवासी अनेक युवक, युवती पाेलीस भरतीच्या तयारीसाठी गडचिराेली जिल्हा व तालुका मुख्यालयी भाड्याने खाेली करून राहतात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मी सातत्याने पाेलीस भरतीची तयारी करीत आहे. आज ना उद्या पाेलीस विभागात नाेकरी मिळेल, ही आशा बाळगून अनेकजणांनी सातत्य ठेवले आहे. मात्र, शासनाला अजूनही पाेलीस भरतीचा मुहूर्त सापडला नाही.
- श्यामदास पुडाे, एटापल्ली
काेट....
मागील दाेन ते तीन वर्षांपासून शासनाच्या वतीने विविध भरती प्रक्रियेत नवीन शासन निर्णय काढणे व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाेलीस भरतीच्या बाबतीतही असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे पाेलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवांमध्ये नैराश्य आहे. भरतीची तयारी करणाऱ्या अनेक युवकांचे वय निघून जात आहे. मी तीन वर्षांपासून पाेलीस भरतीची तयारी करीत आहे. त्यामुळे शासनाने ठाेस निर्णय घेऊन पाेलीस भरती प्रक्रिया लवकर पार पाडावी.
सुरेश काेलते, गडचिराेली