उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 05:30 PM2021-12-07T17:30:45+5:302021-12-07T17:41:42+5:30

काही नगर पंचायतींमध्ये विद्युत प्रवाह व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने उक्त ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता आले नाही व गोंधळ उडाला. त्यामुळे, नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Disruption of internet service election commission give one more day to fill nomination | उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ

उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ

Next
ठळक मुद्दे विस्कळीत इंटरनेट सेवेचा फटका

गडचिरोली : जिल्ह्यातील ९ ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, काही नगर पंचायतींमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक भावी उमेदवारांची तारांबाळ उडाली. परिस्थिती लक्षात घेता, नामांकन दाखल करण्यासाठी आयोगाने एक दिवसाची मुदत वाढवून दिली आहे.

जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा व कोरची या ९ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यासाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने इच्छूक उमेदवारांची बरीच गर्दी होती. मात्र, काही नगर पंचायतींमध्ये विद्युत प्रवाह व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने उक्त ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता आले नाही व गोंधळ उडाला. त्यामुळे, नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जारी पत्र जारी केले आहे. त्यानुसार, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी ८ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील. 

Web Title: Disruption of internet service election commission give one more day to fill nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.