दीडपट वेतनापासून पोलीस वंचित

By Admin | Updated: May 8, 2015 01:32 IST2015-05-08T01:32:06+5:302015-05-08T01:32:06+5:30

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ...

Disregarded police from a dilapidated salary | दीडपट वेतनापासून पोलीस वंचित

दीडपट वेतनापासून पोलीस वंचित

दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता दिला जातो. मात्र शासनाने या संदर्भात निर्णय न घेऊन अनुदान उपलब्ध करून दिले नाही. गेल्या चार महिन्यांपासून नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी दीडपट वेतनापासून वंचित आहेत. परिणामी पोलीस आर्थिक संकटात सांपडले आहे.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याची दखल घेऊन सन २००९ मध्ये निर्णय घेऊन नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीड पट वेतन लागू केले.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात कार्यरत पोलिसांना सन २०१० पासून २०१४ पर्यंत दीड पट वेतनाचा लाभ मिळाला. मात्र राज्य शासनाने २०१५ च्या जानेवारी महिन्यात दीड पट वेतनाबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे शासन निर्णय जारी करण्यात आले नाही. वेतनासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे २०१५ च्या जानेवारी महिन्यापासून नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दीडपट वेतन मिळाले नसल्याची माहिती आहे.
नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सी-६० च्या २४ तुकड्या कार्यरत असून यामध्ये ७५० पोलीस जवान आहेत. नक्षग्रस्त भागातील सी-६० जवान, श्वानपथक, बॉम्बशोधक पथक, नक्षलसेल, वायरलेस व अभियान कक्षातील पोलीस अधिकारी व जवानांना दीड पट वेतन दिले जाते.
राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागातील पोलीस कर्मचाऱ्यांचे दीड पट वेतन थकल्यामुळे या पोलीस जवानांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Disregarded police from a dilapidated salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.