शौचालयाबाबत उदासीनताच
By Admin | Updated: November 16, 2014 22:50 IST2014-11-16T22:50:23+5:302014-11-16T22:50:23+5:30
केंद्र शासनाने यावर्षीपासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू केली आहे. यामुळे जिल्हाभरात स्वच्छता मोहीम जोमात सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच,

शौचालयाबाबत उदासीनताच
गडचिरोली : केंद्र शासनाने यावर्षीपासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू केली आहे. यामुळे जिल्हाभरात स्वच्छता मोहीम जोमात सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींकडे शौचालयच नसल्याने जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियान कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे.
उघड्यावर शौचालयास गेल्याने विविध आजार होत असल्याचे आरोग्य संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्यावतीने अनुदानावर ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. निर्मल भारत अभियानातून जिल्हा परिषदेच्यावतीने शौचालय बांधकामाची मोहीम सुरू आहे. सध्य:स्थितीत जिल्ह्यातील ४६.३९ कुटुंबाकडे शौचालय आहेत. तर ५४.६१ टक्के कुटुंबाकडे शौचालयच नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून अनुदानावर शौचालय बांधकामाची योजना राबविल्या जाते. मात्र अनेक गावातील बहुतांश कुटुंबांनी अद्यापही शौचालय बांधले नसल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्हा १०० टक्के गोदरीमुक्त करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींकडे शौचालय असणे बंधनकारक करावे.(स्थानिक प्रतिनिधी)