काँग्रेस निरीक्षकांसोबत माजी खासदारांची विविध मुद्यांवर चर्चा
By Admin | Updated: October 10, 2015 01:30 IST2015-10-10T01:30:26+5:302015-10-10T01:30:26+5:30
९ नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला.

काँग्रेस निरीक्षकांसोबत माजी खासदारांची विविध मुद्यांवर चर्चा
नेते हजर : कोवासे यांच्या घरी नितीन राऊत यांची भेट
गडचिरोली : ९ नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला.
यावेळी त्यांनी सर्वप्रथम माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी पक्षाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या आगामी ध्येय धोरणाबाबतही नितीन राऊत यांनी माजी खा. कोवासे यांना माहिती दिली. खा. कोवासे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामगिरीबद्दल राऊत यांच्याजवळ समाधान व्यक्त केले.
या भेटीच्या निमित्ताने काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम यांनीही कोवासे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीतबाबत व आगामी निवडणुकीबाबत निरीक्षकासमावेत चर्चा केली.