घारगावात पाणीसमस्येवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST2021-05-06T04:38:50+5:302021-05-06T04:38:50+5:30

तालुक्यातील घारगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. या समस्येवर उपाययाेजना करण्यासाठी ४ एप्रिल ...

Discussion on water issue in Ghargaon | घारगावात पाणीसमस्येवर चर्चा

घारगावात पाणीसमस्येवर चर्चा

तालुक्यातील घारगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. या समस्येवर उपाययाेजना करण्यासाठी ४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन उधारवार, दिनेश शिरपूरकर यांनी गावाला भेट देऊन समस्येवर चर्चा केली.

बैठकीला जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रमोद भगत, सरपंच विवेक भगत, उपसरपंच कबीर आभारे उपस्थित हाेते. बैठकीत गावातील पाणीसमस्येवर चर्चा करण्यात आली. गावातील उपलब्ध जलस्रोत गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी अपुरे पडत आहे. गावाच्या शेजारी वैनगंगा नदी वाहते. मात्र, सध्या गावाची स्थिती ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी ही गंभीर बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा उपविभागीय अधिकारी यांनी गावातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी आपल्या स्तरावरून लवकर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

===Photopath===

050521\05gad_2_05052021_30.jpg

===Caption===

 अधिकाऱ्यांशी समस्येवर चर्चा करताना प्रमाेद भगत.

Web Title: Discussion on water issue in Ghargaon