विमाशि संघाच्या सहविचार सभेत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:36+5:302021-09-19T04:37:36+5:30
जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, संचमान्यता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता, काही कर्मचाऱ्यांचे सहाव्या ...

विमाशि संघाच्या सहविचार सभेत विविध विषयांवर चर्चा
जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, संचमान्यता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता, काही कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय परिपूर्ती देयके, अरिअर्स देयके, कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तक मिळणे, यासह अनेक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
यावेळी सभेला वेतन पथक अधीक्षक दिलीप मेश्राम, व्ही. व्ही. वाळके, विमाशि संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्याध्यक्ष कैलास भोयर, कार्यवाह तथा सिनेट सदस्य अजय लोंढे, शेमदेव चाफले, मनोज निंबार्ते, अजय वर्धलवार, नरेंद्र भोयर, रवींद्र बांबोळे, गजानन बारसागडे, दिलीप गडपल्लीवार, सुनील देशमुख, पुरुषोत्तम उरकुडे, संजय दौरेवार, सतीश धाईत, दीपक पटले, अरविंद लांजेवार, संतोष कवासे, संजय घोटेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.