वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:33 IST2021-03-22T04:33:37+5:302021-03-22T04:33:37+5:30

बैठकीदरम्यान २७ मार्च रोजी शनिवारी सत्कार समारंभ घेण्याचे ठरविण्यात आले. २७ मार्च रोजीच्या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी, नवनिर्वाचित ग्रामपंचायत ...

Discussion on various issues at the meeting of the Disadvantaged Bahujan Alliance | वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

बैठकीदरम्यान २७ मार्च रोजी शनिवारी सत्कार समारंभ घेण्याचे ठरविण्यात आले. २७ मार्च रोजीच्या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, नवीन पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच तालुका कार्यकारिणी व आगामी निवडणुका यावर मार्गदर्शन होणार आहे.

सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते हंसराज बडोले राहतील, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, राज्य महासचिव कुशाल मेश्राम, राहुल वानखेडे, मुरलीधर मेश्राम, प्रफुल्ल मानके, विवेक हाडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे, ज्येष्ठ नेते हंसराज बडोले, उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळे, महासचिव केशव सामृतवार, महासचिव रत्नघोष नान्हीटीकर, कोषाध्यक्ष गजानन बारसिंगे, संघटक धर्मेंद्र गोवर्धन, प्रवक्ता विनोद आजबले, देवराव भरडे आदी उपस्थित होते.

Web Title: Discussion on various issues at the meeting of the Disadvantaged Bahujan Alliance