शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:25 IST2021-06-25T04:25:53+5:302021-06-25T04:25:53+5:30

प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, आदर्श शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष ...

Discussion of pending issues of teachers | शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा

शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा

प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, आदर्श शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल दहीकर, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण ऊईके, देसाईगंज तालुकाध्यक्ष शत्रुघ्न झुरे, सरचिटणीस गंगाधर ठाकरे, कार्याध्यक्ष गिरीधर बावनथडे, मुलचेरा तालुका कार्याध्यक्ष अशोक बोरकुटे, चामोर्शी तालुका युवा अध्यक्ष सुजित दास, चामोर्शी तालुका सहसरचिटणीस महादेव डे, संघटक धनंजय मंडल, प्रदीप गायकवाड, विश्वनाथ म्हस्के उपस्थित हाेते.

पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी सलाम, गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचिक यांना प्रलंबित समस्यांचे निवेदन देऊन चर्च केली. संवर्ग विकास अधिकारी सलाम यांनी निवेदनातील समस्या यथाशीघ्र सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. याप्रसंगी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी नारायण सिडाम, सहाय्यक लेखाधिकारी वासुदेव धकाते, शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक नीता बडोले, कनिष्ठ सहाय्यक अमित लोखंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Discussion of pending issues of teachers