युवक काॅंग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:50+5:302021-01-10T04:27:50+5:30
गडचिराेली : स्थानिक इंदिरा गांधी चाैकातील विश्रामगृहात युवक काॅंग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी नगरपंचायत निवडणूक व संघटनात्मक ...

युवक काॅंग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा
गडचिराेली : स्थानिक इंदिरा गांधी चाैकातील विश्रामगृहात युवक काॅंग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी नगरपंचायत निवडणूक व संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली.
बैठकीला प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजित सिंग,महासचिव इरशाद शेख, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव केतन रेवतकर, विश्वजीत कोवासे, अतुल मल्लेलवार,नंदू वाईलकर, अनिल कोठारे, लाॅरेन्स गेडाम, आरमाेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, नितेश राठोड, राहुल पोरटे, घनश्याम मुरवतकर, संजय चन्ने, चोखाजी भांडेकर, गाैरव एनप्रेड्डीवार, उज्ज्वला मडावी, तोफिक शेख, सर्वेश पोपट, मयूर गावतुरे, नीलेश अंबादे, पुरुषोत्तम बावणे, कल्पक मुप्पीडवार, महेश भांडेकर, राकेश भांडेकर, हिराजी गोहणे, सचिन भांडेकर, वासुदेव नागोसे उपस्थित होते.
आगामी निवडणुकीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजय सिंग यांनी दिले. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रदेश पातळीवर प्रयत्न करू असे आश्वासन प्रदेश सचिव केतन रेवतकर यांनी दिले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, युवक काँग्रेसचे संघटन वाढविण्याकरिता नव्या तरुणांना पक्षात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. तसेच आगामी काळात जिल्ह्यात बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या मागणीकरिता ‘रोजगार दो आंदोलन’ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.