नवे शैक्षणिक धाेरण व शाळांच्या समस्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:58+5:302021-02-05T08:51:58+5:30
सभेत संघटनेचे महत्त्व, धोरण, कार्य तसेच नवे शैक्षणिक धोरण, शाळा, शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक समस्या याबाबत अध्यक्ष संताेष सुरावार ...

नवे शैक्षणिक धाेरण व शाळांच्या समस्यांवर चर्चा
सभेत संघटनेचे महत्त्व, धोरण, कार्य तसेच नवे शैक्षणिक धोरण, शाळा, शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक समस्या याबाबत अध्यक्ष संताेष सुरावार यांनी मार्गदर्शन केले. संघटनेची बांधणी आणखी मजबूत व्हावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर चामाेर्शी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून संजय हिचामी, अध्यक्ष अतुल सुरजागडे, कार्यवाह जयंत बांबोडे, उपाध्यक्ष सागर आडे, सदाशिव बोकडे, सहकार्यवाह अशोक कोवासे, प्रवीण येलेकर, कोषाध्यक्ष दिलीप नैताम, संघटनमंत्री राजू वेलादी, साईनाथ पेंदोर, सहसंघटनमंत्री प्रशांत घरत, विनोद दुधबळे, महिला आघाडी प्रमुख ज्योती जिचकार, सहमहिला आघाडी प्रमुख लक्ष्मी यादव, कार्यालय मंत्री अमर कुत्तरमारे, अतुल येनगंटीवार, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश घोगरे, अभिजित साना, खाजगी प्राथमिक तालुकाध्यक्ष सोमा गुडधे, खासगी प्राथमिक कार्यवाह दिलीप तायडे यांची निवड करण्यात आली. सभेला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत बुरांडे, जिल्हा पदाधिकारी घनश्याम मनबत्तुलवार यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.