तळाेधीत शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:49+5:302021-08-27T04:39:49+5:30
तळाेधी (माे.) : तळाेधी केंद्राची दुसरी शिक्षण परिषद २४ ऑगस्ट राेजी संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्तावाढीवर चर्चा ...

तळाेधीत शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
तळाेधी (माे.) : तळाेधी केंद्राची दुसरी शिक्षण परिषद २४ ऑगस्ट राेजी संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्तावाढीवर चर्चा करण्यात आली.
शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख गाैतम मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक वसंत सहारे, प्रतिभा आकरे, लता इंगळे, भीमराज करमे, नरेश जाम्पलवार, भाऊराव चव्हाण, नीलेश विश्राेजवार, सुजीत दत्ता आदी मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख गाैतम मेश्राम यांनी न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्ष व लाेकशाही ही संवैधानिक मूल्य असणारा समाजशील नागरिक घडविण्याचे ध्येय शिक्षकांनी ठेवले पाहिजेे. शालेय शिक्षणातूनच असे नागरिक घडविता येणे शक्य आहे. शिक्षकांनी स्वत:ला समृद्ध करावे, असे आवाहन केंद्रप्रमुख गाैतम मेश्राम यांनी केले.
प्राजक्ता राजापुरे यांनी संजय नाथे लिखित ‘प्रकाशाच्या पाऊलवाटा’ या प्रेरणादायी पुस्तकाचा परिचय करून दिला. प्रशांत बनकर यांनी ‘लिसनिंग द वर्डस फाॅर एप्रिसिएशन’ ही कृती करवून दाखविली, नीलेश विश्राेजवार यांनी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीमधील अडचणी व करावयाची उपाययाेजना यावर मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार सिंधू दुम्पट्टीवार यांनी मानले.