अनेक ठिकाणी काेराेनाबाधित रुग्णांची गैरसाेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:25+5:302021-04-24T04:37:25+5:30
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढ वेगाने हाेत असल्याने काेविड केअर सेंटर तसेच रुग्णालयात ...

अनेक ठिकाणी काेराेनाबाधित रुग्णांची गैरसाेय
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढ वेगाने हाेत असल्याने काेविड केअर सेंटर तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काेराेनाबाधित रुग्णांची काही प्रमाणात गैरसाेय हाेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी औषधांचाही पुरवठा कमी पडत आहे.
शहरी व ग्रामीण भाग मिळून जिल्हाभरात काेराेनाबाधितांवर उपचार करणारे एकूण १९ रुग्णालये आहेत. हे सर्व रुग्णालये शासकीय आहेत. गडचिराेली जिल्हास्तरावर चार काेविड रुग्णालये आहेत. याशिवाय तालुकास्तरावर काही ठिकाणी दाेन, तर काही ठिकाणी एकच रुग्णालय आहे. जिल्हास्तरावरील चारही काेविड रुग्णालयांत जिल्हाबाहेरील रुग्ण माेठ्या संख्येने दाखल हाेत असल्याने येथे गर्दी झाली आहे.
बाॅक्स...
सहा जिल्ह्यांतील रुग्ण एकाच ठिकाणी
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात असलेल्या काेविड रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह भंडारा, गाेंदिया, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आदी सहा जिल्ह्यांतील बाधित रुग्ण दाखल हाेऊन औषधाेपचार घेत आहेत. बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर काही औषधे उपलब्ध नसल्याने, ती औषधे खासगी दुकानातून घेण्यास सांगितले जाते.
बाॅक्स..
काेरचीच्या रुग्णालयात रुग्णांचे हाल
काेरचीत शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहात दाेन काेविड केअर सेंटर आहेत. येथे आराेग्य कर्मचारी कमी असल्याने वेळेवर राऊंड हाेत नाही. गरम पाणी सहजासहजी मिळत नाही. काही खाेल्यांमधील पंखे बंद आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास उष्णतेमुळे रुग्ण बेहाल हाेत आहेत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष हाेत असल्याची माहिती आहे. शाैचालय व बाथरूमला व्यवस्थित कड्या नसल्याने रुग्णांना त्रास हाेत आहे.
काेट...
माझ्या सुनेचा काेराेना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने काेरचीतील काेविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यासाठी व्यवस्थित लाईट व पंखे नाहीत. पंखा बंद आहे. व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या साेयी-सुविधांकडे लक्ष द्यावे. सुविधा देण्याची व्यवस्था करावी.
- नरपतसिंग नैताम
काेट..
जिल्हास्तरावरील काेविड रुग्णालयात बीपी व शुगर असलेल्या बाधित रुग्णांची बीपी, शुगर तपासणी नियमित करणे आवश्यक आहे. मात्र ही तपासणी वाॅर्डात नियमित हाेत नाही. रुग्णसंख्या वाढल्याने येथे गर्दी झाली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर औषधी बाहेरून घेण्याचा सल्ला मिळत आहे.
- देवराव चवळे
काेट..
तालुकास्तरावरील काेविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेवर औषधाेपचार मिळण्यास अडचणी येत आहे. नाश्ता व भाेजन उशिरा येत असून, प्रतीक्षा करावी लागते. सकाळचे भाेजन दुपारी दोननंतर मिळत असते. या सेवेत योग्य ती सुधारणा व्हावी.
- रामभाऊ किरंगे