Direct subsidy for seeds now | बियाण्यांसाठी आता थेट अनुदान
बियाण्यांसाठी आता थेट अनुदान

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम । सातबारा, आधारकार्ड व बँक पासबुकची गरज

दिगांबर जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाºया बियाणांसाठी यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पहिल्यांदाच थेट अनुदान योजना सुरू केली आहे. धानावर ७००, तूर १०० व सोयाबिन बियाण्यांवर जास्तीत जास्त १ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
१३ वने ७ टक्के वन महसूल अंतर्गत जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध होते. या निधीतून जिल्हा परिषद महाबिजकडून बियाणे खरेदी करून सदर बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले जात होते. या योजनेत शेतकºयाला जिल्हा परिषद उपलब्ध करून देईल, तेच बियाणे खरेदी करावे लागत होते. बºयाचदा दुसºया वाणाची लागवड करायची असल्याने शेतकरी इच्छा असूनही अनुदानावरील बियाणे खरेदी करीत नव्हते. तसेच महाबिजकडील बियाणे उगविल्या नसल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या.
जिल्हा परिषदेचे कृषी सभापती नाना नाकाडे यांनी यातून मार्ग शोधत बियाणांचे अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची योजना यावर्षीपासून सुरू केली आहे.
धानाच्या बियाण्यांसाठी ११ लाख रुपये, तुरीच्या बियाण्यांसाठी ४ लाख रुपये व सोयाबिनच्या बियाण्यांसाठी १ लाख रुपये अनुदान मंजूर केला आहे. सदर अनुदानाची रक्कम पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाºयांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्याने बियाणे खरेदीचे बिल संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात बियाण्यांवरील अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी जे गावे वनव्याप्त आहेत, अशा गावांमधील शेतकरी पात्र ठरणार आहेत. शेतकऱ्यांना नोंदणीकृत कृषी केंद्रातून धान, तूर व सोयाबिन या पिकांचे जे वाण आवश्यक आहे, ते वाण खरेदी करू शकणार आहेत. जिल्हा परिषदेच्या या नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
अनुदानासाठी ही आहे प्रक्रिया
आधार कार्ड, सातबारा व बँक पासबूकची झेरॉक्स घेऊन पंचायत समितीच्या कृषी विभागामध्ये जायचे आहे. ही सर्व कागदपत्रे दाखविल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला परिमिट दिले जाईल. शेतकºयाने परवानाधारक कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करायचे आहे. बियाणांचे ओरिजनल बिल पंचायत समितीच्या कृषी विभागात सादर करतील. परमिट दिल्यानंतर दोन दिवसातच बियाणे खरेदी करायचे आहे. त्यानंतर खरेदी केलेले बियाणे अनुज्ञेय राहणार नाही. पक्क्या बिलानुसार खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा धान बियाण्यांवर ७०० रुपये, तूर बियाण्यांवर १०० रुपये तर सोयाबिन बियाण्यांवर १ हजार रुपये अनुदान दिले जाईल. एखाद्या शेतकºयाने तिन्ही प्रकारचे बियाणे खरेदी केले तर त्याला तिन्ही बियाण्यांवर अनुदान देय राहिल.


Web Title: Direct subsidy for seeds now
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.