ज्योत्स्ना दर्डा यांना आदरांजली
By Admin | Updated: March 27, 2015 01:08 IST2015-03-27T01:08:31+5:302015-03-27T01:08:31+5:30
‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष स्व. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

ज्योत्स्ना दर्डा यांना आदरांजली
धानोरा : ‘लोकमत’ सखी मंच धानोराच्या वतीने स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मंगळवारी ‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष स्व. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त ‘लोकमत’ सखी मंच धानोराच्या वतीन भावगीत व वन मिनीट गेम शो स्पर्धा घेण्यात आली. तसेच हळदी- कुंकू कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भारती मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून वैशाली वाहाने, प्रा. जयश्री लोखंडे, स्नेहलता गजभिये आदी उपस्थित होत्या. स्पर्धेतील विजेत्या सखींना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ‘लोकमत’ सखी मंचच्या धानोरा तालुका संयोजिका रंजना गडपाडे, प्रेमिला बल्की, रीतू नरोटे, इंदिरा निकम, शर्मिला म्हशाखेत्री, जैबून कुरेशी, नंदा इंदूरकर, धारा जांभुळकर, ध्रृपता मडावी, रेखा घाटे, ज्योती उंदीरवाडे, भावना म्हशाखेत्री आदी उपस्थित होत्या. संचालन अनिता तुमराम यांनी केले. तर आभार रंजना गडपाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शीला भैसारे, फातमा कुरेशी, चौधरी, फिरोजा जाफर शेख, म्हशाखेत्री, वाघमारे यांनी सहकार्य केले.