डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅन दाखल
By Admin | Updated: March 1, 2017 01:38 IST2017-03-01T01:38:30+5:302017-03-01T01:38:30+5:30
केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान व इलेक्ट्रानिकी मंत्रालयाच्या वतीने डिजीटल इंडिया कार्यक्रमांतर्गत

डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅन दाखल
जनजागृती करणार : विविध डिजिटल सेवांच्या वापराची माहिती पोहोचविणार
गडचिरोली : केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान व इलेक्ट्रानिकी मंत्रालयाच्या वतीने डिजीटल इंडिया कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील लोकांना विविध डिजीटल सेवांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी डिजीटल इंडिया मोबाईल व्हॅन दाखल झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदूरकर यांनी सदर मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून वाहन रवाना करण्यात आले. याप्रसंगी शिवशंकर टेंभुर्णे, अनिल गोतमारे, भौंड, रवींद्र सनान्से यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आधार कार्ड नोंदणी, सार्वजनिक सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध आॅनलाईन सरकारी सेवा, माझे सरकार पोर्टल, डिजीधन, जनधन योजना, कॅशलेस व्यवहार, ई-रूग्णालय, ई-पोस्ट, भारत नेट आदींची माहिती लोकांना दिली जाणार आहे.
असा आहे मोबाईल व्हॅनचा प्रवास
सदर डिजीटल इंडिया मोबाईलव्हॅन १ मार्च रोजी देसाईगंज तालुक्याच्या आमगाव, कोरेगाव, २ मार्च रोजी कुरखेडा तालुक्यातील कढोली, कुरखेडा येथे फिरणार आहे. ३ मार्च रोजी आरमोरी व शेगाव, ४ मार्च रोजी चामोर्शी तालुका, घोट, आष्टी, ६ मार्च रोजी अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली व ७ मार्च रोजी सिरोंचा, जाफ्राबाद येथे जाईल.