शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

विवाह जुळवताना अडचणी; अटी- शर्थीमुळे उपवरांचा जीव मेटाकुटीला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 16:49 IST

Gadchiroli : पस्तिशी ओलांडलेल्यांची प्रत्येक गावांमध्ये निर्माण झाली फौज

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : विवाह सोहळा अनेक धर्मात हा एक विधी, संस्कार, करार या स्वरूपात पाहिला जातो. कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विवाह ही एक कायदेशीर पद्धती आहे. विवाहात फक्त एका स्त्री आणि पुरुषाचा संबंध जोडला जात नाही, तर दोनपेक्षा अधिक कुटुंब जोडले जातात. असे जरी असले, तरी सध्याच्या काळात विवाह जुळवणे आणि तो टिकवणे तारेवरची कसरतच असते. विवाह जुळवताना अनेक अडचणी येतात. सध्या प्रत्येक गावांमध्ये पस्तिशी ओलांडलेल्या उपवरांची फौज दिसून येते.

पूर्वीच्या काळी एखाद्या मुलामुलींचा विवाह घरातील वडीलधारी मंडळी, कर्ते व्यक्ती परस्पर ठरवायचे. अनेकदा मुले-मुली एकमेकांना थेट लग्नातच पाहायचे. संगणक आणि मोबाइलच्या युगात आणि करिअरचा विचार करून उत्पन्नाचा, शिक्षणाचा विचार करून विवाह ठरायला लागले. या सर्व झटापटीत अनेक मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. अनेक मुला-मुलींचे रूपांतर प्रौढांत होत असल्याने बेरोजगारांचे व शेतकरी पुत्रांचे विवाह जुळणे ही सामाजिक समस्या बनली आहे.

सूचक केंद्रही झाले हतबलअनेक विवाह संस्था, वधू-वर सूचक केंद्र, विवाह जमवणारे रात्रंदिवस प्रयत्न करतात; मात्र तरीही ही समस्या सुटताना दिसत नाही. वैद्यकीय दृष्टीने पाहता मुला-मुलींच्या वयाला संततीप्राप्तीसाठी ठराविक मर्यादा आहे. वय जसे वाढत जाईल तसतसी संततीप्राप्तीची प्रक्रिया गुंतागुंतीची होत जाते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. वधू-वर सूचक केंद्रांनाही विवाह जुळवताना अडचणी येत आहेत.

खोडेच खोडे• विवाह जमवताना आई- वडिलांव्यतिरिक्त नातलगांमधील अनेकांचा विचार घेतला जातो. ते सुद्धा अनेक चौकशा करून खोडा घालतात.

बेरोजगार, शेतकरी मुलांसमोर आव्हानलग्न जुळवताना मुलगा नोकरी करतो काय, त्याच्याकडे रोजगार आहे काय? की तो सरकारी नोकरी करतो, याची आवर्जून चौकशी केली जाते. मुलीच्या वडिलांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, याचा ठाव लागत नाही.• अनेक लग्नसंबंध जमवताना मुली-मुलांबरोबरच दिसण्याची तुलना करतात, अनेकदा पगाराची तुलना करतात, शिक्षणाची तुलना करतात आणि चांगल्या मुलांना नकार देतात. बेरोजगार युवा, तसेच शेतकरी मुलाला लग्न जुळवण्यासाठी कसरत करावी लागते.

युवक व युवतींचे लग्न उशिरा जुळते. यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. भविष्यात मूलबाळ होण्यासाठी अडचणी येऊ शकतात किवा उशीर लागू शकतो. यामुळे योग्य वयात लग्न होणे आवश्यक आहे.डॉ. शीलू चिमूरकर, आरमोरी

 

टॅग्स :marriageलग्नGadchiroliगडचिरोली