बाबासाहेबांच्या उपकारांची परतफेड करणे कठीण - राजकुमार बडोले
By Admin | Updated: January 18, 2016 01:32 IST2016-01-18T01:32:49+5:302016-01-18T01:32:49+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. त्यांनी भारत देशाला दिलेल्या संविधानामुळेच बहुजनांना खऱ्या अर्थाने ...

बाबासाहेबांच्या उपकारांची परतफेड करणे कठीण - राजकुमार बडोले
हजारोंची उपस्थिती : मोहटोला येथे भगवान बुध्दांच्या मूर्तीचे अनावरण
देसाईगंज : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. त्यांनी भारत देशाला दिलेल्या संविधानामुळेच बहुजनांना खऱ्या अर्थाने समता आणि स्वातंत्र्यता मिळाली, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तालुक्यातील मोहटोला येथे रविवारी आनंद बुध्द विहाराच्या अनावरणप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भंते नागार्जून सुरई ससाई, आमदार क्रिष्णा गजबे, भंते नागघोष, भंते नागसेन, भंते नागधम्मा, भंते धम्माबोदी, जि.प.चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आविसचे नंदू नरोटे, विजय बन्सोड, डॉ. विजय मेश्राम, चंद्रशेखर बांबोळे, देसाईगंज न.प.चे बांधकाम सभापती मोतीलाल कुकरेजा, माजी जि.प. सदस्य यादवराव ठाकरे, सरपंच हिरालाल शेंडे, संजय गणवीर, रमेश घुटके, दिगांबर मेश्राम आदी उपस्थित होते.
बौध्द समाज तथा रमाबाई महिला मंडळाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या हस्ते भगवान बुध्दांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. तथागत बुध्दाच्या प्रज्ञा, शील, करूणेचे प्रतिबिंब प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पळावे, तसेच प्रत्येकांनी समता, बंधूता या नात्याने जीवन घालवावे, असे आवाहन नामदार बडोले यांनी यावेळी केले. याप्रसंगी आमदार क्रिष्णा गजबे व उपस्थित भंतेंनी बौध्द उपासक व उपासीकेंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद घुटके, चरणदास लोखंडे, अशोक घुटके, नेत्रकला लोखंडे, भागवत शेंडे, अमरदास शेंडे, गोसावी चहांदे यांच्यासह बौध्द समाज, रमाई महिला मंडळ, भारतीय बौध्द महासभा, दलित वस्ती सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी दादाजी चहांदे यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)