तळेगावात अतिसाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:59 PM2019-03-24T23:59:18+5:302019-03-25T00:00:05+5:30

तालुक्यातील तळेगाव येथील एका खासगी विहिरीच्या दूषित पाण्याच्या वापरामुळे गावातील १९ जणांना अतिसाराची लागण झाली. त्यांना रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Diarrhea infection in Talegaon | तळेगावात अतिसाराची लागण

तळेगावात अतिसाराची लागण

Next
ठळक मुद्देअशुद्ध पाण्याचा परिणाम : ब्लिचिंग पावडर उपलब्ध, पण वापरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील तळेगाव येथील एका खासगी विहिरीच्या दूषित पाण्याच्या वापरामुळे गावातील १९ जणांना अतिसाराची लागण झाली. त्यांना रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा नळयोजनेची पाईपलाईन फुटल्याने आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक विहीरी, हातपंप व खासगी विहिरीच्या पाण्याचा नागरिकांकडून केला जात आहे. मात्र गावातील जलरक्षक विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी येथील वामन उईके यांच्या खासगी विहिरीच्या पाण्याच्या वापरामुळे अनेकांना उलटी, मळमळ व हागवणीचा त्रास सुरू झाला. सरपंच शशिकला कुमरे यांनी पुढाकार घेत रु ग्णवाहिकेच्या मदतीने १९ जणांना उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रु ग्णालयात घेणाऱ्यांमध्ये दीपक नैताम (३२), सुरेखा नैताम (२०), वाहलू सहारे (५८), अमित दाण (२१), सुनंदा नैताम (६०), कामुना मलकाम (६५), जानिका मलकाम (१४), शीला नैताम ६८), करु णा नैताम (४०), भुपेश उईके (२७), चांगेश उईके (२९), शशिकला मडावी (६२), मचिंद्रनाथ जुमनाके (२३), निर्मला राऊत (४०), रीना जुमनाके (२९), विद्या राऊत (३०), हर्षा उईके (४०), ज्योत्स्ना राऊत (१९), हिरा जुमनाके (४५) यांचा समावेश आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश दामले यांनी तळेगाव येथे वैद्यकीय चमू पाठविली असल्याचे सांगितले.
तळेगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेली सार्वजनिक नळ योजना सन २००५ ला बांधकाम करण्यात आलेली आहे. सुरूवातीच्या कालावधीत सती नदी घाटावर असलेली स्वीच रूम व पाईपलाईन पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याने योजनेत अनेक वेळा बिघाड निर्माण होत होता.
मागील वर्षी पक्के व व्यवस्थित बांधकाम करण्यात आल्याने वर्षभरापासून योजना सुरळीत सुरू होती. मात्र मागील ४ दिवसांपूर्वी मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद होता, असे ग्रामपंचायत सचिवाने सांगितले.

नळ योजनेच्या पाईपलाईन दुरूस्तीची कार्यवाही सुरू असून लवकरच ही योजना पूर्ववत करण्यात येईल. गावातील सार्वजनिक विहीरी, हातपंपाकरीता आवश्यक प्रमाणात ब्लिचिंगचा पुरवठा जलरक्षकाकडे करण्यात आला आहे. असे असताना ब्लिचिंगच्या कमतरतेमुळे अतिसाराची लागण झाली की दुसऱ्या कारणाने हे तपासले जाईल.
- दिगांबर लाटेलवार,
सचिव, ग्रामपंचायत तळेगाव

Web Title: Diarrhea infection in Talegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य