या कार्यक्रमची सुरुवात तालुक्यात करण्यात आली असून तालुक्यातील ३० गावामध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील १९१८ मुले व १८६५ मुली असे एकूण ३७७२ बालकांना आशा स्वयंसेविकाच्या मार्फत कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार ३०३५ घरांना गृहभेट देऊन अतिसाराविषयी जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावायची काळजी, ओआरएस. व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करायचा यांची प्रात्यक्षिक करून त्याचे वाटप करणे, आरोग्य संस्थामध्ये ओआरएस. व झिंक कोपरा स्थापन करणे व अतिसार झालेल्या बालकांवर उपचार या गोष्टीवर भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाची व्याप्ती व महत्व जाणून घेण्यासाठी सावंगी, कोरेगाव व कुरुड या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील गावात व्यापक जनजागृती होण्यासाठी हात धुण्याचे प्रात्यक्षिक दिले जात आहे.
या अतिसार नियंत्रण पंधरवड्याला सहकार्य करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक कुंभरे यांनी आवाहन केले आहे. तसेच डॉ. अशोक गहाणे, डॉ सडमेक, डॉ बनसोड यांनी आपल्या आरोग्य संस्थामध्ये नुकतेच प्रशिक्षण घेतले आहे. या मोहिमचे सहनियंत्रण तालुका समूह संघटक कविता आठवले, गट प्रवर्तक जोशना रामटेके, दीपिका गुरुनुले, विद्या सहारे व फर्जाना शेख करीत आहेत. यांसाठी तालुका आरोग्य सहाय्यक उमाकांत दरडमारे व दिनकर संदोकर सहकार्य करीत आहेत.
160721\img-20210716-wa0042.jpg
आरोग्यसेविका अतिसार पंधरवाडा निमित्य बालकांना डोज देतांना.