शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

गडचिरोलीत धो-धो... भामरागडचा संपर्क तुटला, राष्ट्रीय महामार्गासह डझनभर रस्ते बंद

By संजय तिपाले | Updated: July 18, 2023 12:42 IST

पर्लकोटा पूल पाण्याखाली : नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गडचिरोली : अर्धा जुलै सरला तरीही जिल्ह्यात सरासरीपेक्षा निम्माही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. १७ जुलै रोजी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर धो- धो पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गासह डझनभर रस्ते पाण्याखाली गेले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आलापल्ली- भामरागड महामार्ग क्र.१३० डी वर भामरागड येथे पर्लकोटा नदी तुडूंब भरुन वाहत आहे. नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भामरागडमधील अंतर्गत रस्ते देखील पाण्याखाली गेले असून आवश्यकतेनुसार वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.  हे रस्ते गेले पाण्याखाली

चातगाव -कारवाफा- पोटेगाव- पावीमुरांडा- घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगांव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला), कुनघाडा- गिलगांव पोटेगाव रस्ता (पोटेगावजवळ), तळोधी- आमगाव -एटापल्ली -परसलगोंदी- गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी), तळोधी -आमगाव -एटापल्ली- परसलगोंदी -गट्टा रस्ता (बांडीया नदी), अहेरी -आलापल्ली -मुलचेरा रस्ता (गोमणी नाला), अहेरी- आलापल्ली- मुलचेरा- घोट रस्ता (कोपरअली जवळील नाला), अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला), आलापल्ली- ताडगाव -भामरागड राष्ट्रीय महामार्ग ( पर्लकोटा नदी), आलापल्ली -ताडगांव -भामरागड - लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व (बिनागुंडा नाला), कसनसूर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्ली जवळील नाला, एलचिल जवळील नाला), कसनसूर -एटापल्ली- आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला) आष्टी – गोंडपिंप्री- चंद्रपूर हे रस्ते पाण्याखाली गेल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

एसटी बसचा खोळंबा, वीजपुरवठाही बंद

भामरागडमध्ये १८ जुलै रोजी सकाळी ६ वाजता नागपूर, ७ वाजता गडचिरोली तर पावणेनऊ वाजता कोठी बस मार्गस्थ झाली, पण या बस पुराच्या पाण्यामुळे रोखून धरल्या आहेत. वादळ-वाऱ्यात झाडाच्या फांद्या तुटल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे. बांडीया नदीच्या पुलावर पाणी राहिला तर संपूर्ण तालुका संपर्क तुटू शकतो.

टॅग्स :Rainपाऊसenvironmentपर्यावरणfloodपूरGadchiroliगडचिरोली